फणिंद्र सामा – नाव जरी साधं असलं तरी त्याने घडवलेली कहाणी असामान्य आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या फणिंद्रला 2005 मध्ये दिवाळीनिमित्त हैदराबादला जायचे होते. मात्र, त्याला बसचे तिकीट मिळत नव्हते. त्या काळात बस तिकीट विक्रीचे नियंत्रण एजंटकडे होते. प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी अनेक एजंटांना भेटावे लागे किंवा सतत फोन करावे लागत. शिवाय तिकीट किमती आणि उपलब्धतेबाबत कोणतीही पारदर्शकता नव्हती. हीच समस्या फणिंद्रला सतावत होती, पण त्याने त्यातूनच एक मोठी व्यवसायिक संधी शोधली – ऑनलाइन बस बुकिंग सेवा, जी पुढे जाऊन प्रवास उद्योगात क्रांती घडवणारी ठरली.
रेडबसचा प्रवास – एका कल्पनेपासून अब्जावधी रुपयांच्या व्यवसायापर्यंत
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी, फणिंद्र सामाने टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीतील आपली नोकरी सोडली आणि दोन मित्रांसह फक्त ५ लाख रुपयांच्या भांडवलावर रेडबसची सुरुवात केली.
२००७ पर्यंत रेडबसकडे ५० बस ऑपरेटर जोडले गेले आणि कंपनीने ५ कोटी रुपयांची विक्री केली. याच काळात SeedFund कडून ३ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. या यशाने रेडबसच्या वाढीला गती मिळाली आणि कंपनीने ग्राहकांना सोयीसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या.
रेडबसने सुरु केल्या नावीन्यपूर्ण सुविधा
• ऑनलाइन बस ट्रॅकिंग – प्रवाशांना आपली बस कुठे आहे याची अचूक माहिती मिळू लागली.
• प्रामाणिक ग्राहक रेटिंग्स – प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बस कंपन्यांचे रेटिंग दिसू लागले.
• महिलांसाठी राखीव जागा – प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली.
या सुविधांमुळे रेडबसची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि २०१० पर्यंत रेडबसच्या विक्रीने ६० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. याच दरम्यान, Inventus Capital Partners ने रेडबसमध्ये ८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
८०० कोटींची विक्री – भारतीय स्टार्टअप क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा
रेडबसचा झपाटा पाहता, Ibibo Group या आंतरराष्ट्रीय प्रवासी तिकीट क्षेत्रातील दिग्गज कंपनीने २०१३ मध्ये रेडबसला तब्बल ८०० कोटी रुपयांना विकत घेतले. ही भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टार्टअप अधिग्रहणांपैकी एक होती.
स्टार्टअप उद्योगातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
फणिंद्र सामाने एका सामान्य समस्येतून एका क्रांतिकारी व्यवसायाची संकल्पना उभी केली आणि लाखो प्रवाशांचे आयुष्य सोपे केले. आज रेडबस हा भारताचा नंबर १ बस बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. BITS पिलानीच्या या माजी विद्यार्थ्याने सिद्ध करून दाखवले की योग्य कल्पना, कष्ट आणि जिद्द असल्यास तुम्ही कोणत्याही समस्येतून सुवर्णसंधी निर्माण करू शकता!
जगभरात वाढत्या तापमानामुळे, अनियमित पावसामुळे, वितळणाऱ्या हिमनगांमुळे आणि बदलत्या हवामानामुळे मानवजातीसमोर एक मोठं आव्हान उभं…
BJP vs Congress Vote theft : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील…
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…