उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही महिन्यांपूर्वी पतीचा खून करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्याच पद्धतीची थरकाप उडवणारी घटना आता राजस्थानातील खैरथल जिल्ह्यात घडली आहे. किसनगडबास परिसरात एका ‘रिल’स्टार बायकोने स्वतःच्या नवऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये भरला आणि नंतर तीन मुलांना घेऊन बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. अखेर राजस्थान पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
रविवारी (17 ऑगस्ट) किसनगडबास येथे एका घराच्या छतावर मोठा निळा ड्रम सापडला. त्यातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळवले. ड्रम उघडून पाहिल्यावर त्यामध्ये एका तिशीतील पुरुषाचा मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. मृतदेह पटकन विघटित व्हावा यासाठी त्यावर मीठ टाकण्यात आले होते.
पोलिस चौकशीत या मृतदेहाची ओळख हंसराम (रा. शहाजहानपूर, उत्तर प्रदेश) अशी पटली. हंसराम गेल्या दोन महिन्यांपासून बायको व तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होते. मात्र घटनेनंतर त्याची रिल क्विन बायको व मुले गायब होते. शिवाय घरमालकाचा मुलगाही बेपत्ता असल्याने संशय अधिक गडद झाला.
पोलिसांनी शोधमोहीम राबवून काही दिवसांतच प्रकरण उकलले. हंसरामची बायको ही सोशल मीडियावर रील्स बनवणारी ‘रिल स्टार’ असल्याचे समोर आले. तसेच तिचे घरमालकाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी खैरथल तिजारा भागातून हंसारामची बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…