ठाकरे VS दुबे: भाषेच्या वादात ‘X’ वर शाब्दिक रणकंदन

Political News

मराठी आणि हिंदी मुद्दयावरून राज्यात वादविवाद सुरू आहेत. अमराठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. निशिकांत दुबे यांनी “स्वत:च्या घरी कुणीही सिंह असतो. हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ… महाराष्ट्राबाहेर या… मराठी लोगों को हम पटक पटक के मारेंगे, असे ते म्हटले होते.

शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिरा-भाईंदर येथे सभा झाली. या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी निशिकांत दुबे यांना पुन्हा आव्हान केले. यावेळी दुबे नावाचा कोण तरी भाजप खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू… ही बाब कोणत्याच हिंदी चॅनेलने दाखवली का? त्याच्यावर केस झाली का? असा प्रश्न केला. त्याचबरोबर “दुबेला मी सांगतो दुबे तुम मुंबई में आजाओ… मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…” असे म्हणत राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रतिउत्तर दिले.

मात्र आता, निशिकांत दुबे यांनी त्यांच्या अधिकृत “X” हँडलवरून राज ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करत “मैंने राज ठाकरे को हिंदी सिखी दी?” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे आता या वादाला पुन्हा नव्याने तोंड फुटतयं की काय असे वाटू लागले आहे.

Leave a Reply