Raigad Crime Story
रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एक थरकाप उडवणारं खून प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे प्रेम अखेर रक्तरंजित वळणावर जाऊन संपलं आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाने रायगड जिल्हा हादरला आहे.
Virat Kohli: विराटने मोठ्या भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी; लवकरच लंडनला शिफ्ट होण्याची शक्यता
मृत तरुणाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, पेण) असे असून त्याचा खून पत्नी दिपाली अशोक निरगुडे (19), प्रियकर उमेश सदु महाकाळ (21) आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी (19) यांनी संगनमत करून केला आहे. या तिघांना नागोठणे पोलिसांनी केवळ 24 तासांत गाठून अटक केली आहे.
दिपालीचे पती कृष्णाशी संबंध ताणलेले होते. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सोशल मीडियावर उमेश महाकाळ या तरुणाशी झाली. हळूहळू या दोघांचे ‘इंस्टाग्राम प्रेम’ वाढत गेले आणि त्यांनी कृष्णाला संपवण्याचा कट रचला.
त्यासाठी “वारगुडे” या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले. या खात्यामार्फत कृष्णाशी संवाद साधून त्याला “मैत्रिणी”च्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी आरोपींनी कृष्णाला नागोठणे एस.टी. स्टँडवर बोलावले. त्यानंतर त्याचे अपहरण करून वासगावच्या जंगलात नेण्यात आले. तिथे त्याला ओढणीने गळा आवळून ठार मारण्यात आले.
खून केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले, तसेच त्याचा मोबाईल फोडून पाली रोडलगत फेकून दिला.
सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता म्हणून नोंदवण्यात आले होते. मात्र, नागोठणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी तांत्रिक तपास वापरून आरोपींपर्यंत पोहोच घेतली आणि अखेर तिघेही जाळ्यात अडकले.
पोलिस चौकशीत आरोपी दिपालीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पतीकडून सतत त्रास होत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. तिच्या प्रियकर उमेशच्या मदतीने तिने पतीला संपवण्याची योजना आखली होती. या कटात तिची मैत्रीण सुप्रिया देखील सहभागी झाली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास केवळ वेगाने नव्हे तर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केल्याने नागोठणे पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…