Political News

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून अधिक जुना आहे. एकेकाळी बाळू आंदेकर आणि नंतर त्याचा भाऊ सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या नेतृत्वाखाली या टोळीने आपला दबदबा निर्माण केला होता. टोळीयुद्धातून आलेल्या हिंसक मार्गातून आंदेकर कुटुंबीयांनी राजकारणातही प्रवेश केला, जेव्हा बाळूची बहीण वत्सला आंदेकर (अक्का) पुणे शहराच्या महापौर बनल्या होत्या.पुढे जाऊन हेच आंदेकर कुटुंब पुण्यात सुरु असलेल्या टोळीयुद्धासाठी कारणीभुत ठरलं, आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर यांच्या वडिलांची हत्या केली, ज्याचा सूड म्हणून माळवदकर टोळीने १९८४ मध्ये बाळू आंदेकरची शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात हत्या केली. या दहा वर्षांच्या टोळीयुद्धात सहाहून अधिक गुंड मारले गेले.माळवदकर टोळीचा अंत: १९९७ मध्ये पुणे क्राईम ब्रँचने प्रमोद माळवदकरचा एन्काऊंटर केल्यावर हे टोळीयुद्ध शांत झाले. माळवदकर टोळीचा अस्त झाल्यावर, आंदेकर कुटुंबातील अंतर्गत कलह आणि मालमत्तेच्या वादातूनच ‘कोमकर’ टोळीसोबतचे वैमनस्य सुरू झाले. हे विशेष आहे कारण कोमकर कुटुंब हे आंदेकर कुटुंबाचे नातेवाईक आहे. बंडू आंदेकर यांची मुलगी कोमकर कुटुंबात दिली. मालमत्ता, दुकान आणि कुटुंबामधील वितुष्ट यातून हा वाद वाढत गेला. बंडू आंदेकरचा माजी नगरसेवक मुलगा वनराज आंदेकर आणि त्याचे मामा असलेले गणेश आणि जयंत कोमकर यांच्यात संघर्ष सुरू झाला.

वनराज आंदेकरची हत्या

सध्या चर्चेत असलेले ‘आंदेकर विरुद्ध कोमकर’ टोळीयुद्ध हे सूडाच्या परंपरेचे ताजं उदाहरण आहे. या संघर्षाला खरी धार मिळाली ती मागील काही वर्षांतील हत्यांमधून, वनराज आंदेकर यांची हत्या सप्टेंबर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचा ‘बॅकबोन’ म्हणून ओळख असलेल्या वनराज आंदेकर यांची नाना पेठ परिसरात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. हल्ला करण्यापूर्वी रस्त्यावरची वीज खंडित केली आणि गोळ्या झाडल्यानंतरही कोयत्याने डोके फोडले या हत्येप्रकरणी गणेश कोमकर, जयंत कोमकर यांच्यासह २१ आरोपींना अटक करण्यात आली होती. या हत्येमागे टोळीअंतर्गत वाद आणि संपत्ती वाद असल्याचं समोर आलं होतं.

आयुष कोमकरची हत्या

वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात ही थरारक घटना घडली. धक्कादायक म्हणजे, आयुष हा वनराज आंदेकर यांचा भाचा होता, ज्यामुळे हा संघर्ष केवळ टोळ्यांमध्ये नसून, एकाच कुटुंबातील सदस्यांमधला आहे हे समोर आलं. : सूडाची मालिका इथेच थांबली नाही.

गणेश काळे याची हत्या

वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी समीर काळेचा सख्खा भाऊ गणेश काळे या रिक्षाचालकाला कोंढवा परिसरात भरदिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून ठार मारण्यात आले. या हत्येचा सूत्रधार बंडू आंदेकर हाच असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
गणेश काळे हा कुख्यात गुंड आणि वनराज हत्या प्रकरणातला आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ होता. या टोळीयुद्धातील सूडाची आग अजूनही धगधगत असल्याचे सिद्ध झाले.ज्यात अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे उघड झालं..

सध्या सुरू असलेल्या या टोळीयुद्धात एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले झाले आहेत. या संघर्षाने पुणे शहरात मोठी दहशत निर्माण केली आहे.या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करणे, सोशल मीडियावर गुन्हेगारीचे ‘रिल्स’ व्हायरल करणे आणि वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या हत्या करणे, हा नवा धोकादायक ट्रेंड दिसून येत आहे.’विद्येचे माहेरघर’ असलेल्या पुणे शहराला या टोळीयुद्धाने ‘मर्डर हब’ बनवले असून, पुणे पोलिसांसमोर या सूडाच्या चक्राला कायमस्वरूपी मोडून काढण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

3 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

21 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

21 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago

World Cup 2025 च्या विजयामागील खरा हिरो कोण?

कधी काळी स्वतःला भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूने, आज भारताला विश्वविजेता बनवलं आहे. ही…

3 days ago