Pune Crime: पती नपुंसक, सासऱ्याने केली सेक्सची मागणी; सुनेची पोलिसात धाव

News Trending

पुण्यातील सहकारनगर परिसरात माजी सहाय्यक पोलिस आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी सुनेच्या आरोपानुसार, पती नपुंसक असल्याचे लपवून लग्न लावण्यात आलं. त्यानंतर नातवासाठी सासऱ्याने स्वतःच्याच सुनेशी संबंध ठेवण्याची विकृत मागणी केली. इतकंच नव्हे तर तिच्या बेडरूममध्ये घुसून बळजबरीचा प्रयत्नही करण्यात आला. विरोध केल्यावर जीव घेण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे पुण्यातील गुन्हेगारी जगतात मोठी चर्चा रंगली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

30 वर्षीय पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार, विवाहाच्या वेळी पती नपुंसक असल्याची गोष्ट जाणीवपूर्वक लपवण्यात आली होती. लग्नानंतर वारस व्हावा यासाठी सासू-सासऱ्याने सुनेवर अमानवी दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही, तर पीडितेच्या म्हणण्यानुसार पती आणि सासू यांनी थेट सासऱ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती सुरू केली.

23 जून रोजी पीडिता घरात एकटी असताना निवृत्त एसीपी जबरदस्तीने तिच्या बेडरूममध्ये घुसले. पदाचा धाक दाखवत त्यांनी संबंध ठेवण्याची मागणी केली. विरोध केल्यावर पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे पीडिता माहेरी गेली, माहेरच्यांच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

संपूर्ण प्रकरण उघड झाल्यानंतर आरोपी कुटुंबाने घराला कुलूप लावून पलायन केले आहे. सध्या सहकारनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. नवरा व सासु-सासऱ्यांच्या अशा अमानवी वागण्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply