P. L. Deshpande Maharashtra Kala Academy
मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
पु. ल. देशपांडे कला अकादमी ही केवळ एक वास्तू नाही, तर ती महाराष्ट्राच्या रंगभूमीचा आत्मा आहे. विविध कला प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या या संकुलाने अनेक प्रतिभावान कलाकार घडवले आहेत. याच परंपरेला नवा साज चढवणारे नवीन बोधचिन्ह अनावरणाच्या तयारीत आहे.
नूतनीकरणानंतर अकादमी अधिक अत्याधुनिक आणि सुविधायुक्त झाली आहे.
लोककला, अभिजात कला, दृश्यात्मक आणि दृकश्राव्य कला यांना पूरक ठरणारे हे संकुल नवोदित आणि दिग्गज कलाकारांसाठी पर्वणी ठरणार आहे. नाटक, संगीत, चित्रपट आणि दृकश्राव्य माध्यमांसाठी आवश्यक अशा सर्व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.
रंगभूमीच्या विकासाला नवा आयाम देणारे पु. ल. देशपांडे कला अकादमी संकुल नव्या युगात प्रवेश करत आहे. कलाक्षेत्र, शिक्षण, नवसंजीवनी आणि नवकल्पना यांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या या संकुलाचे उद्घाटन सोहळा रसिकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरणार आहे.२८ फेब्रुवारी २०२५ – नाट्यरसिक, कलाकार आणि कलाप्रेमींसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरणार आहे!
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि…
सध्या सर्वत्र विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमात मराठी आणि हिंदी कलाकारांची…
आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा अंतिम शाही स्नान सोहळा अत्यंत उत्साहात…
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. 'प्लास्टिक…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात प्रथमच 'पिंगुळी लोककला महोत्सव २०२५' रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…
भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी एक मोठी कामगिरी नुकतीच घडली आहे. शूटिंगमध्ये चमक दाखवणारी मनू…