अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर टीकेचा सूर लावत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या विधानामुळे केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक स्तरावरही चर्चेला तोंड फुटलं आहे.
काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने भारतावर २५% टॅरिफचे संकट लावले. त्यानंतर रशियाकडून कच्चं तेल आयात करतो म्हणून भारतावर अजून २५% टक्क्यांचे टॅरिफ लादले गेले. या निर्णयामुळे भारतीय नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असतानाच, पीटर नवारो भारतावर सातत्याने टीका करत आहेत. नुकतेच फॉक्स न्यूज चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत भारतातील विशिष्ट समाजावर गंभीर विधान केले आहे.
मुलाखतीमध्ये नवारो यांनी भारतातील काही निवडक श्रीमंत व्यावसायिकांचाच आर्थिक फायदा करून दिला जात असल्याच्या आरोपासह भारत म्हणजे रशियासाठी फक्त धुणीघर असल्याचं म्हटलं आहे. सामान्य भारतीयांचं नुकसान करून काही मोजक्या ब्राम्हण व श्रीमंत व्यावसायिकांचे खिसे भरले जात आहेत, असा घणाघात त्यांनी केला. नवारो पुढे म्हणाले की, भारताने रशियाकडून कच्चं तेल घेतल्यामुळे तेथील पैशातून रशिया युक्रेनविरोधी युद्धासाठी शस्त्रास्त्रांची खरेदी करत आहे. याचा थेट परिणाम युक्रेनच्या नागरिकांच्या जीवाशी होत आहे.
याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही भाष्य केले. “मोदी हे महान नेते आहेत. मात्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारक रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत इतकी जवळीक का साधत आहेत, हे कळत नाही,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमध्ये SCO परिषदेसाठी उपस्थित होते. या दौऱ्यात मोदी यांनी पुतिन यांच्यासमवेत गळाभेट घेतली आणि शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. हे फोटो मोदींनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नवारोंची टीका अधिक चर्चेत आली.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…