Entertainment

“कशाला हवेत मोडके पुल” पहिल्याच महाराष्ट्र भूषण सोहळ्यात पडली होती वादाची ठिणगी

1996 साल… शिवसेना – भाजप युतीचे सरकार. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असावा ही संकल्पना प्रत्यक्षात येत होती. विशेष म्हणजे “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार सुरू व्हावा यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वत: आग्रही होते. तसेच पहिला सन्मान अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांना मिळावा, अशी आग्रही शिफारस देखील त्यांनी केली होती. मात्र या पुरस्कारानंतर वेगळच राजकारण घडलं, ज्याबद्दल आजही त्याबाबत अनेकदा चर्चा होते.

महाराष्ट्र सरकारने पहिला पुरस्कार पु.ल. देशपांडे यांना जाहिर केला. पु.ल.देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत सरकारवर टोकदार टीका केली. निवडून आलेले पक्ष लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतात, असं विधान त्यांनी व्यासपीठावरून केलं. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या हे विधान थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर असल्याचं बोललं गेल. साहजिकच बाळासाहेबांच्या हे जिव्हारी लागलं.

पुरस्कार सोहळ्याच्या दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उद्धाटनावेळी त्यांनी पुलांचा उल्लेख “मोडके पूल” असा केला. आम्ही ठोकशाहीवाले आहोत तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता? असा सवाल करत त्यांनी झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला असे जळजळीत उद्गार काढले. त्यांनतर “सामना” मध्ये “कशाला हवेत मोडके पुल” अशा शीर्षकाचा अग्रलेख छापून पुलंवर जोरदार टीका करण्यात आली.

पुलं आणि बाळासाहेब यांचे नाते तसे फार जुणे होते. ज्या शाळेत बाळासाहेबांचे शिक्षण झाले, तिथे पु.ल शिक्षक होते. हा जुना ऋणानुबंध राजकारणापेक्षा मोठा ठरला. काही दिवसांनी झालं गेलं सगळ विसरून पुलंच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तिथे बाळासाहेबांनी पुलंची नतमस्तक होऊन माफी मागितली आणि त्यांच्यातील वाद कायमचा मिटवला.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

14 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

14 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago