Categories: Random News

Nyos lake disaster १९८६ची ‘ती’ रात्र आणि १७०० लोकांच्या मृत्यूचा तलाव

Nyos lake disaster that erupted and killed thousands – २१ ऑगस्ट, १९८६ ची ती रात्र… आणि झोपेतच १७०० लोक आणि ३५०० जनावरांचा मृत्यू झाला… झाडं-इमारती जशाच्या तशा होत्या पण लोकांच्या मृतदेहांचा खच पडलेला… ही घटना जगातील सर्वात भयावह नैसर्गिक वायू दुर्घटनांपैकी एक ठरली… ती म्हणजे मृत्यूचं दार-नरकाचं द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्योस ज्वालामुखी तलावाची..

१९८६ च्या त्या रात्री, आफ्रिकेतील कॅमेरूनच्या उत्तर-पश्चिम भागातील न्योस नावाच्या ज्वालामुखी तलावातून लिम्निक इरप्शनमुळे अचानक मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइडचा ढग तयार झाला. कार्बन डायऑक्साइड जड असल्यामुळे हा ढग जमिनीवर पसरला. काही मिनिटांतच तलावाच्या आसपासची खेडी या अदृश्य वायूच्या ढगाखाली झाकली गेली.

यामुळे गुदमरून १,७४६ लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३,५०० जनावरे ठार झाली. ही घटना इतकी अचानक घडली की, अनेकजण झोपेतच मृत्यूमुखी पडले. कोणतीही इमारत किंवा झाड मोडले नव्हते, परंतु, शांत रात्री शांततेचं मृत्यूचा थरार झालेला..

न्योस तलाव हा ज्वालामुखी क्रेटर लेक आहे. तलावाच्या तळाशी ज्वालामुखीमुळे कार्बन डायऑक्साइड सतत तयार होत असते. साधारणपणे हा वायू तलावाच्या पाण्यात विरघळून राहतो. पण १९८६ मध्ये भूकंप, भूस्खलन किंवा पाण्याच्या तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे, तलावातील पाण्याचे थर उलटे झाले (limnic eruption). त्यामुळे तळाशी साचलेला वायू प्रचंड प्रमाणात वर आला आणि स्फोटासारखा बाहेर पडला. हा वायू जमिनीलगतच्या भागातून सुमारे २५ किमी परिसरात पसरला… हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो. परंतु, तिथल्या लोकांना सल्फर-कुजक्या अंड्यांसारखा वास लोकांना येऊ लागला. आणि काही तासात लोक आणि जनावरं तडफडून मेली, तर काहींना पॅरालिसिस चा अटॅक आला , श्वसनाचा त्रास होऊ लागला, स्ट्रोक्स आले. या घटनेने अनेक लोकांना मानसिक आघातही झाला..

दुर्मीळ नैसर्गिक आपत्तीत २१ ऑगस्ट, १९८६ची ही घटना नोंदवली जाते. असेच कोणते इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून सांगा…

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago