Random News

UPI Cash Withdrawal : ATM शिवाय आता काढता येणार कॅश ! Smartphoneनेच मिळणार १० हजार रुपये !

UPI Cash Withdrawal : आपल्याला कॅश काढायची असेल, तर बँक किंवा एटीएम मशीनशिवाय पर्याय नसतो. कधीकधी ऐनगरजेच्या वेळी एटीएम मशीन्स उपलब्धदेखील नसतात. डिजिटल व्यवहाराचा पर्याय नाही आणि कॅशही मिळत नाही, अशी परिस्थिती आपल्यावर अनेक वेळा येते. काही दुर्गम भागात अजूनही एटीएम मशीन्स पोहोचलेल्याही नाहीत. मात्र, ही चिंता आता कायमची मिटणार आहे.

स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढणे आता आणखी सोपे होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दिशेने मोठी तयारी करत आहे. एका अहवालानुसार, लवकरच देशभरातील २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉंडंट आउटलेट्सवर युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पैसे काढता येणार आहेत. यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) मंजुरी मागितली आहे.

बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे काय?
बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे असे स्थानिक प्रतिनिधी जे दुर्गम भागांमध्ये बँकिंग सेवा पुरवतात, जिथे एटीएम किंवा बँकेच्या शाखा उपलब्ध नाहीत. हे स्थानिक प्रतिनिधी दुकानदार, स्वयंसेवी संस्था किंवा कोणतीही व्यक्ती असू शकते. सध्या लोक आधार-आधारित प्रमाणीकरण किंवा डेबिट कार्ड वापरून मायक्रो एटीएमद्वारे बीसी पॉइंट्सवरून पैसे काढतात.

व्यवहार कसा होईल?
या योजनेनुसार, या बीसी आऊटलेट्सवर ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवरील कोणत्याही UPI ॲपचा वापर करून QR कोड स्कॅन करून रोख रक्कम काढू शकतील. या व्यवहाराची मर्यादा प्रति ट्रान्झॅक्शन १०,००० रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या निवडक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या नव्या प्रणालीचा फायदा अशा ग्राहकांना होईल, ज्यांना फिंगरप्रिंट प्रमाणीकरणात अडचणी येतात किंवा ज्यांना डेबिट कार्ड वापरणे सोयीस्कर वाटत नाही. हे एक मोठे पाऊल आहे, जे बँकिंग सेवा अधिक सोयीस्कर बनवेल. एनपीसीआयने २०१६ मध्ये UPI लाँच केले होते आणि हे नवीन पाऊल त्याचाच विस्तार मानला जात आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

19 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

19 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago