जगातील असं शहर जिथे मृत्यूवर बंदी आहे!

News

मृत्यू हा कोणाच्याही नियंत्रणात नसतं. ते एक अटळ सत्य आहे. मात्र, एका शहराने मृत्यूवरच बंदी घातलेय. ऐकून तुमचंही डोकं गरगरलं असेल, नाही का? नॉर्वेमधील लोन्गिरब्येन या शहराची ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल.

लोन्गिरब्येन हे शहर उत्तर ध्रुवावर वसलेले असून, येथे वर्षभर कठोर थंडी असते. या शहरात १९५० पासून मृत्यूवर बंदी आहे, आणि इथे कोणताही मृतदेह दफन केला जात नाही. यामागचं कारण पाहून तुम्ही थक्क व्हाल!

१९१७ मध्ये या शहरात इन्फ्लूएंझामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, थंड हवामानामुळे मृतदेह कुजला नाही आणि त्यातील इन्फ्लूएंझाचा विषाणू जिवंत राहिला. यामुळे भविष्यात साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला. १९५० मध्ये शास्त्रज्ञांनी या घटनेचा अभ्यास करून शहर प्रशासनाला सूचित केले की, मृतदेहांचे योग्य विघटन होत नसल्याने इथल्या नागरिकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेत, शहरात मृत्यूवर बंदी घातली. जर एखाद्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असेल किंवा मृत्यू होण्याची शक्यता असेल, तर त्याला तत्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने नॉर्वेच्या इतर भागात हलवलं जातं. मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारदेखील त्या ठिकाणीच केले जातात.

लोन्गिरब्येनमध्ये केवळ २,००० लोकसंख्या असून, या शहरात एक लहान स्मशानभूमी आहे. मात्र, या स्मशानभूमीत गेल्या ७२ वर्षांपासून एकही मृतदेह दफन करण्यात आलेला नाही. मृत्यू टाळण्यासाठी, शहरात कठोर नियम पाळले जातात. उत्तर ध्रुवावर वसलेल्या या शहरात मे ते जुलैदरम्यान सूर्य अस्ताला जात नाही. या काळात रात्र होतच नाही. अतिशय कठीण हवामान असूनही येथील नागरिक आनंदाने जीवन जगतात.

लोन्गिरब्येनसारखीच जगातील इतर काही ठिकाणीही मृत्यूवर बंदी आहे. फ्रान्समधील कॉग्नाकमध्ये २००७ला स्मशानभूमी उभारण्याचा प्रकल्प रद्द झाल्याने महापौरांनी मृत्यूवर बंदी घातली. इटलीमधील सेलियामध्ये लोकसंख्येत घट होऊ नये म्हणून आजारी पडल्यास दंड आकारला जातो. जपानमधील इत्सुकुशिमा या पवित्र मानल्या जाणाऱ्या बेटावर जन्म आणि मृत्यू दोन्हीला परवानगी नाही.

मृत्यूवर बंदी घालणाऱ्या या शहराची ही अनोखी कहाणी तुम्हाला कशी वाटली? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा!

Leave a Reply