२०२५ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, आणि अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना का जाहिर झाला नाही, याच्या चर्चा सुरु झाल्या, मध्यंतरी शांततेचा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनाच मिळणार याच्या चर्चा होत होत्या, मात्र २०२५ शांततेचा नोबेल पुरस्कार वेनेझुएला देशाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला. आता पाहुयात नोबेल पारितोषिक – मारिया कोरिना मचाडो यांना का देण्यात आला?
वेनेझुएला हे कधीकाळी तेलसंपन्न,प्रगतिशील राष्ट्र म्हणून ओळखले जात होते. मात्र हुकूमशाही आणि सत्तेचा गैरवापर यामुळे देश आर्थिक आणि सामाजिक अराजकतेत सापडला. या संकटाच्या काळात एक स्त्री आवाज उठवते — मारिया कोरिना मचाडो.
त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी शांततामय, अहिंसात्मक आंदोलनांचा मार्ग स्वीकारला आणि लोकांना एकत्र आणले.
मारिया मचाडो यांनी आपल्या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्क — स्वतंत्र निवडणुका, मुक्त पत्रकारिता, आणि प्रतिनिधिक शासनव्यवस्था यासाठी लढा दिला. २००२ साली, मचाडो यांनी “Súmate” नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था वेनेझुएलामध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घडवून आणण्यासाठी काम करत होती. पण सरकारला हे नको होतं. त्यांना देशद्रोहाचे आरोप लावले गेले आणि अमेरिकेकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला. या खोट्या आरोपांनंतरही त्यांनी संस्था बंद केली नाही. २०१४ मध्ये वेनेझुएलातील आर्थिक संकट आणि बेरोजगारी वाढल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. मारिया मचाडो यांनी शांततेचा मार्ग स्वीकारत मोठं आंदोलन केलं होतं.
रस्त्यावर हजारो नागरिक “WE want independence” या घोषणांनी दुमदुमले. सरकारने त्यांना “देशद्रोही” घोषित केलं आणि संसदेतून हाकललं, पण त्यांनी म्हटलं — “लोकशाहीतून मला काढून टाकता येईल, पण लोकांच्या हृदयातून नाही.”
हा प्रसंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला
एका भाषणात त्यांनी सांगितलं —
“मी एक आई आहे, एक नागरिक आहे, आणि माझ्या मुलांच्या भविष्याकरता मी लढतेय.”
त्यांच्या या वाक्याने अनेक महिला आंदोलक पुढे आल्या आणि महिलांचा सहभाग आंदोलनात प्रचंड वाढला.त्यांनी हुकूमशाहीविरोधात ठाम भूमिका घेतली.अनेक वेळा त्यांना धमक्या, राजकीय निर्बंध आणि कारावासाच्या धमक्या मिळाल्या. तरीही त्यांनी हिंसाचाराचा मार्ग न स्वीकारता लोकशाही आणि संवादाचा मार्ग निवडला.त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक रस्त्यावर उतरले, आंदोलन केले, आणि “लोकशाही ही प्रत्येक नागरिकाची शक्ती आहे” हा संदेश दिला. एकदा राजधानी काराकासमध्ये झालेल्या सभेत, सरकारने त्यांना तिथे बोलू न देण्याचा आदेश दिला.
पण त्या तिथे पोहोचल्या, हजारो लोकांनी त्यांचं स्वागत केलं.
त्या व्यासपीठावर उभ्या राहून म्हणाल्या, “जर माझा आवाज दाबलात, तर वेनेझुएलाचा प्रत्येक नागरिक बोलू लागेल.”
त्या क्षणी जमलेल्या गर्दीने संविधानाचे प्रतीक असलेली पुस्तिका हवेत उंचावली. तो प्रसंग अजूनही चर्चेत आहे,
सरकारने त्यांना अनेक वेळा अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा पासपोर्ट जप्त केला, आणि राजकीय कारभारातून वगळण्याचा आदेश दिला.तरीही त्यांनी हार मानली नाही.त्यांनी जगभरातील पत्रकार परिषदांमध्ये वेनेझुएलातील परिस्थिती मांडली आणि लोकशाहीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला.
२०१८ मध्ये, मचाडो आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणार होत्या. एअरपोर्टवर पोहोचल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट रद्द केला.
त्यांना थांबवण्याचा हेतू स्पष्ट होता, पण त्या परत घरी गेल्या आणि म्हणाल्या, “ते माझा पासपोर्ट घेऊ शकतात, पण माझं देशप्रेम नाही.”
“मारिया कोरिना मचाडो यांनी वेनेझुएलातील नागरिकांना लोकशाहीचा आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, वेनेझुएला आज मुक्त निवडणुकांकडे आणि स्वातंत्र्यपूर्ण समाजाकडे वाटचाल करत आहे.”त्यांच्या धैर्याने जगातील इतर अनेक देशांतील महिलांना प्रेरणा मिळाली आहे की संघर्ष कितीही कठीण असला तरी बदल शक्य असतो.मारिया कोरिना मचाडो यांच्या नोबेल विजयाने जगाला एक स्पष्ट संदेश दिला आहे, “लोकशाहीसाठीचा संघर्ष कधीही व्यर्थ जात नाही.”
त्यांचा प्रवास हा दाखवतो की शांतता,संवाद आणि धैर्य यांच्या आधारावरच स्वातंत्र्य मिळते.आज जेव्हा जगात हुकूमशाही आणि असहिष्णुतेचे सावट वाढत आहे, तेव्हा मचाडो यांसारख्या नेत्यांचा आवाज आपल्याला आठवण देतो की –स्वातंत्र्य आणि लोकशाही ही प्रत्येक पिढीला मिळवून द्यावी लागणारी लढाई आहे.त्यांचे नोबेल पारितोषिक हे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, वेनेझुएलातील प्रत्येक नागरिकाच्या आशेचा विजय आहे. नोबेल शांतता पारितोषिक जाहीर झाल्यावर त्यांनी फक्त एवढंच म्हटलं —
“हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, तो त्या प्रत्येक वेनेझुएलियनसाठी आहे ज्याने अन्यायाच्या काळातही आशा सोडली नाही.”
