भारत-पाकिस्तान आशिया चषक 2025 च्या फायनलनंतर दुबईच्या स्टेडियमवर मध्यरात्री एक वेगळाच नाट्यमय प्रसंग घडला. मॅचमध्ये पराभवाचा कडवा घोट घेतल्यानंतर पाकिस्तानी संघ जवळपास तासभर आपल्या ड्रेसिंग रूमधून बाहेरचं पडला नाही. बक्षीस वितरणावेळी भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. ” नक्वी स्टेजवर असतील तर आम्ही जाणार नाही” असे सांगत भारतीय खेळाडूंनी मेडल्स घेण्यासही नकार दिला.
भारतीय खेळाडूंनी नकार दिल्यानंतर नक्वी चक्क ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन निघून गेले. मात्र यामुळे भारतीय संघाने सेलिब्रशेन सुरूच ठेवले. ट्रॉफी नसली तरी टीम इंडियाने हटके अंदाजात विजय साजरा केला आणि सोशल मीडियावर नक्वींची चांगलीच फिरकी घेतली.
हार्दिकचा “नो ट्रॉफी, नो प्रॉब्लेम” ट्रेण्ड
सामना जिंकल्यानंतर सामान्यत: पीचवर खेळाडूंचे ट्रॉफीसह फोटोशूट केले जाते. मात्र पाकिस्तानी मंत्री ट्रॉफी घेऊन पळून गेल्याने ट्रॉफीच नव्हती. यावेळी हार्दिक पंड्याने पीचवर उभे राहून फोटो काढला व बाजूला ट्रॉफीचा इमोजी लावून इंस्टावर फोटो पोस्ट केले. हार्दिकचा हा ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, हार्दिकने पाकिस्तानी मंत्र्यांची लाज काढल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
गिल आणि अभिषेकची पोस्ट व्हायरल
सलामवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानेही हातात ट्रॉफी असल्यासारखा पोज देत ट्रॉफीचा इमोजी लावून फोटो पोस्ट केला आणि फोटोखाली “Don’t need trophies to show who we are” असे कॅप्शन दिले आहे.
सूर्याचा तिरकस टोमणा
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तिलक वर्मासोबत ट्रॉफी पोज देत फोटो शेअर केला. या फोटोला “सामना संपल्यानंतर विजेता कोण हे लक्षात ठेवा, ट्रॉफीचा फोटो नाही, असा टोमणा मारला.
बीसीसीआयचा इशारा
नक्वी ट्रॉफी आणि पदक घेऊन गेल्यानंतर बीसीसीआयने अधिकृत इशारा देत जिंकलेली ट्रॉफी आणि मेडल्स भारतीय संघाकडे लवकरात लवकर सुपूर्द करण्याची मागणी केली आहे.
