Navaratri fasting Rules

Navaratri 2025: म्हणून करावा नवरात्रीचा उपवास ! सुखसमृध्दीसाठी हे नियम नक्की पाळा…

Lifestyle News Trending

Navaratri 2025 : नवरात्री अगदी २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. गरबा-दांडिया यांचा जेवढा उत्साह आहे, तेवढाच घटस्थापना, देवीची पूजा, उपवास यांचीही तयारी सुरु आहे. अनेक घरांमध्ये नवरात्रीचे उपवास केले जातात. कुलदेवतेसाठी नवरात्रीचे उपवास केले जातात. पण केवळ ४ लोक करतात म्हणून आपणही तसे नवरात्रीचे उपवास करू नये. उपवासाचे काही नियम असतात, त्यानुसार उपवास केले तर त्याचे अधिक चांगले फळ मिळते. मग जाणून घेऊया उपवासाचे काय आहेत नियम… का करतात नवरात्रीचे उपवास…

Crime Story : ‘ती’ ट्यूशनला गेली आणि तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाली !

Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

का करतात नवरात्रीचे उपवास ?

हिंदू धर्मातील शारदीय नवरात्र हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. वर्षातून ४ वेळा नवरात्र येते पण विशेषत्वाने शारदीय नवरात्र भक्तिभावाने साजरा केला जातो. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते. स्त्रीशक्ती, भक्ती आणि आत्मसंयम यांचा संगम असलेला हा सण केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण मानला जातो.

Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

‘एक Xerox दे ना’ म्हणणाऱ्यांनो झेरॉक्स म्हणजे काय माहीत आहे का? उत्तर ऐकून पुन्हा नाही मागणार झेरॉक्स

नवरात्र उपवास ही या उत्सवाची सर्वात महत्त्वाची परंपरा आहे. उपवास म्हणजे केवळ अन्नपाणी टाळणे नव्हे, तर आत्मिक शुद्धीकरणाचा आणि भक्तीभाव वाढवण्याचा मार्ग आहे. उप+वस म्हणजे गुरूंच्या किंवा देवाधर्माच्या सान्निध्यात राहणे. प्राचीन शास्त्रांमध्ये उपवासाला तपाचा एक महत्त्वाचा प्रकार म्हटले गेले आहे. यामुळे मन शुद्ध होते, एकाग्रता वाढते आणि भक्ताला देवीकृपेचा अनुभव मिळतो असे मानले जाते. उपवास म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, इच्छा-वासना बाजूला ठेवून दिव्य शक्तीशी जवळीक साधणे होय.

कसे करावे नवरात्रीचे उपवास

परंपरेनुसार, काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात, तर काही फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात. उपवासाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. कुणी फळे, दूध आणि रसावर उपवास करतो; कुणी साबुदाणा खिचडी, शेंगदाणे, बटाट्याचे पदार्थ खातो; तर काहीजण फक्त पाण्यावर उपवास करून आपली भक्ती व्यक्त करतात. काही ठिकाणी तर अन्न-पाणी पूर्णपणे वर्ज्य करून कडक उपवास करण्याची प्रथादेखील आहे. नवरात्राच्या दिवसांत सात्विकतेला प्राधान्य दिले जाते. दिवसा हलके आहार घेऊन संध्याकाळी साधे, सात्विक जेवण करणे ही पारंपरिक पद्धत आहे. या काळात दानधर्म करणे, कन्या पूजन करणे आणि साधेपणाने जीवन जगणे यालादेखील विशेष महत्त्व आहे.

Narendra Modi : नरेंद्र मोदीच नसते तर….

आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नवरात्र उपवासाचे आरोग्यदायी फायदेही स्पष्ट दिसतात. ऋतू बदलाच्या काळात शरीरात अनेक शारीरिक बदल होतात. या काळात हलका आणि सात्विक आहार घेतल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचनसंस्था सुधारते. उपवासामुळे शरीराला डिटॉक्स होण्यास मदत होते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन संतुलित राहते आणि शरीरातील ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाते. काही संशोधनांनुसार उपवासामुळे मानसिक शांतता मिळते आणि एकाग्रता वाढते. म्हणजेच उपवास हा अध्यात्म आणि आरोग्य यांचा एक सुंदर संगम ठरतो.

उपवास करताना ‘हे’ टाळा

नवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मांसाहार, अंडी, कांदा-लसूण, गहू, तांदूळ आणि डाळी यांचे सेवन टाळावे. साध्या मिठाऐवजी फक्त सैंधव मीठ वापरावे. दारू, सिगारेट किंवा इतर व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी, दूध आणि ताज्या फळांचे रस पिणे गरजेचे आहे. वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी कडक उपवास करू नये, तर हलक्या स्वरूपातील सात्विक आहारावर भर द्यावा.

या दिवसांत श्रद्धा आणि शुद्धतेला प्रचंड महत्त्व दिले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे, देवीची आराधना करणे आणि दानधर्म करणे हे भक्तिमार्गाचे आवश्यक घटक आहेत. नवरात्रात काळे कपडे घालणे, केस किंवा नखे कापणे टाळले जाते. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कन्या पूजन करण्याची परंपरा आजही भक्तिभावाने पाळली जाते. यात लहान मुलींची देवीच्या रूपात पूजा केली जाते आणि त्यांना प्रसाद व भेटवस्तू देण्यात येतात.

अशा प्रकारे नवरात्र उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून तो भक्ती, आत्मसंयम, सात्विकता आणि आरोग्य यांचा सुंदर संगम आहे. हा उपवास मनाला शांती, शरीराला उर्जा आणि आत्म्याला शुद्धी देणारा आहे. म्हणूनच नवरात्र उपवास ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा, भक्ती आणि आस्थेने पाळली जाते.

Leave a Reply