Navaratri Remadies Navaratri 2025

Shardiya Navratri 2025: दुर्गादेवी होईल प्रसन्न ! अखंड सुखसमृद्धीसाठी या नवरात्रीत करा ‘हे’ उपाय

Lifestyle Trending

Navaratri Remedies 2025 : नवरात्र हा शक्तीची उपासना करण्याचा जणू महोत्सव असतो ! हिंदू धर्मातील सर्वोच्च देवतांपैकी एक असलेल्या आदिशक्ती दुर्गा, ही शक्ती, निर्मिती आणि विनाशाची देवी मानली जाते. ती केवळ वाईट शक्तींचा नाश करत नाही, तर आपल्या भक्तांना ज्ञान, समृद्धी आणि मोक्षही प्रदान करते. विशेषतः, नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची, म्हणजेच नवदुर्गेची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. तुम्हालाही जर देवी दुर्गाला प्रसन्न करायचे असेल आणि तिचे आशीर्वाद मिळवायचे असतील, तर हे काही सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील.

Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव ! वाचा सविस्तर

Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

‘एक Xerox दे ना’ म्हणणाऱ्यांनो झेरॉक्स म्हणजे काय माहीत आहे का? उत्तर ऐकून पुन्हा नाही मागणार झेरॉक्स


नवरात्रीत देवीची कृपा मिळवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, शक्य असल्यास नऊ दिवसांचा उपवास करा, देवीची पूजा करून आरती करा आणि गरजूंना दान-धर्म करा. घरात ‘कलश’ आणि ‘धान्याचे कोठे’ रिकामे ठेवू नका आणि श्रीयंत्राची पूजा केल्यास धनलाभ होतो.

देवीला प्रसन्न करण्यासाठी उपाय
नियमित पूजा आणि दिवा लावा: सकाळ आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून दुर्गा मातेची पूजा करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

उपवास करा: शक्य असल्यास नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उपवास करा. उपवासाने मनाची शांती वाढते आणि शरीर हलके राहते.

घटस्थापना करा: नवरात्रीत घटस्थापना करून देवीची स्थापना करा. या पूजेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे कलश लावणे.

श्रीयंत्राची पूजा करा: नवरात्रीत श्रीयंत्राची पूजा केल्याने धनाचा वर्षाव होतो असे मानले जाते.

देवीची आरती आणि दान करा: पूजा झाल्यावर दुर्गा मातेची आरती करा. गरजूंना अन्न, वस्त्र दान केल्याने मन शुद्ध होते आणि देवीचे आशीर्वाद मिळतात.

घरातील सकारात्मकतेसाठी आणि समृद्धीसाठी

घरात दिवा प्रज्वलित ठेवा: देवीच्या कृपेसाठी पूजेतील दिवा प्रज्वलित ठेवणे महत्त्वाचे आहे.

धान्याचे कोठे रिकामे ठेवू नका: धान्य भरलेले ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक समृद्धी टिकते.

जिथे स्वच्छता असते, सकारात्मकता असते, कुटुंबामध्ये आदर असतो तिथे लक्ष्मी वास करते. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील, याची काळजी घाई. भांडण, वाद-विवाद, अपशब्द वापरू नका. अपमान करू नका. पैसे-अन्नाला पाय लावू नका. महालक्ष्मीअष्टक, महिषासुरमर्दिनी आणि श्रीसूक्ताचा पाठ करा. ललितापंचरत्न स्तोत्राचे अनुष्ठान करा. सकाळी लवकर सूर्योदयावेळी केलेली लक्ष्मीची उपासना अधिक फलदायी असते.

असे काही सोप्पे उपाय या नवरात्रीत केले. तर अधिक सुखसमृद्धी मिळेल.

Leave a Reply