Navaratri 2025 :कोकणस्थांची कुलदेवी बीडची अंबेजोगाई कशी झाली? वाचा योगेश्वरीची अद्भुत कथा

Lifestyle News

समस्त कोकणस्थांची आणि कोकणातील अनेक कुळांची कुलदेवता बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई (Ambejogai) आहे हे तुम्ही ऐकलं असेल. अनेक कोकणस्थांना आणि कोकणातील लोकांनाही आपली देवी अंबेजोगाई कशी हे माहीतही नसेल. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का,कोकणात राहणाऱ्या लोकांची कुलदेवी बीडमधील अंबेजोगाई कशी झाली? याची कथा तर खूप रंजक आहे. जाणून घेऊया..

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक गाव म्हणजे अंबेजोगाई/ अंबाजोगाई. मराठीचे आद्य कवी, ‘विवेकसिंधु’कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे स्थान.

Navaratri 2025: राजमाता जिजाऊ साक्षात जगदंबेच्या कन्या! इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !

Shardiya Navratri 2025: दुर्गादेवी होईल प्रसन्न ! अखंड सुखसमृद्धीसाठी या नवरात्रीत करा ‘हे’ उपाय

अंबाजोगाई नाव कसे मिळाले ?

देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप. ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. दांतसूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचा नाश केला. दांतसूरचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस जोगाईचे आंबे आणि पुढे आंबेजोगाई, असे नाव प्रचलित झाले. दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी झाली.

Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव ! वाचा सविस्तर

Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

अंबेजोगाई देवी कोकणस्थांची देवी कशी झाली ?

अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे. त्यामागे एक कथा सांगितली जाते, परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. कोकणातून आडिवरे येथून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला, पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते आजचे अंबाजोगाई/अंबेजोगाई. ११व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले.

देशावरची ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे. हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडित आहे. परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यावर, त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तिथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या १४ व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. या १४ व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईतून वधू नेल्या. वधू नेताना योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल, त्यांच्या कुळांची योगेश्वरी ही कुलदेवता असेल.

देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

Leave a Reply