Navaratri 2025

Navaratri2025:अभ्यासासाठी सरस्वती, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवी आणि उत्तम स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा देवीच का ?

News Trending

तुम्ही कधी लक्ष दिलंय का? चांगलं जेवण बनवणाऱ्या स्त्रीला आपण अन्नपूर्णा म्हणतो, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करतो आणि परीक्षेला जाताना सरस्वतीमातेचे आशीर्वाद घेतो. पण का असं? स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा, धनासाठी लक्ष्मी आणि ज्ञानासाठी सरस्वतीच का? याच देवींचीच का उपासना केली जाते? चला तर आज जाणून घेऊया यामागील सुंदर कथा..

Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत आहे का? जिथे अजूनही येते रामायणाची अनुभूती

Navaratri 2025 :कोकणस्थांची कुलदेवी बीडची अंबेजोगाई कशी झाली? वाचा योगेश्वरीची अद्भुत कथा

Navaratri2025: नवरात्रीत महाअष्टमीला का असते सर्वाधिक महत्त्व?

अन्नपूर्णा देवी – जगाला अन्न देणारी माता

आपण जेवणापूर्वी अन्नपूर्णा देवीचं स्मरण करतो. स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीची पूजा करतो. पण तिची पूजा का केली जाते, यामागे एक कथा आहे. एकदा भगवान शिवांनी पार्वतीला सांगितलं, “हे जग माया आहे, अगदी अन्नसुद्धा.” पार्वतीला हे ऐकून राग आला. त्यांनी ठरवलं की जर अन्न माया आहे, तर संपूर्ण जगातील अन्नच गायब करायचं.

क्षणात सृष्टी उपाशी झाली. देव, ऋषी, माणसं सर्वत्र हाहाकार माजला. अगदी भगवान शिवही अन्नाशिवाय व्याकुळ झाले. त्यांनी पार्वतीला विनंती केली, ”अन्नाशिवाय जग टिकू शकत नाही. कृपया अन्नपूर्णा स्वरूपात प्रकट हो.”
पार्वतीने अन्नपूर्णा रूप धारण करून पुन्हा जगाला अन्न दिलं.
याचीच उपकथा म्हणजे पार्वतीदेवी रागावल्यामुळे संपूर्ण विश्वात अन्नाचा हाहाकार उडाला. तेव्हा फक्त वाराणसी येथे एका स्वयंपाक घरात जेवण मिळत होतं. भगवान शिव स्वतः भिक्षापात्र घेऊन तिथे गेले. तेव्हा स्वतः पार्वती अन्नपूर्णा रूपात जेवण वाढत होती.म्हणून अन्नपूर्णा देवीला काशिपुराधिवासिनी म्हणतात आणि उत्तम स्वयंपाकासाठी तसेच स्वयंपाकघर समृद्ध राहण्यासाठी अन्नपूर्णा देवीची पूजा करतात.

लक्ष्मी देवी – संपन्नतेची अधिष्ठात्री

धन आणि समृद्धीचा संबंध लक्ष्मीशी आहे. लक्ष्मीच्या कथेनुसार, देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं. मंथनातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. त्यातीलच एक लक्ष्मीदेवी.तिच्या दर्शनाने चारही दिशांना प्रकाश आणि समृद्धी पसरली. ती धन, सुख आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री ठरली.
आजही प्रत्येक घरात लक्ष्मी नांदावी, घरात संपन्नता राहावी, यासाठी दीपावलीला लक्ष्मीपूजन केले जाते. व्यवसायात यश, घरात सुख-शांती मिळण्यासाठी लक्ष्मीची आराधना केली जाते.

सरस्वती देवी – ज्ञान आणि बुद्धीची देवी

विद्या ही जीवनातील खरी संपत्ती आहे. सृष्टीची निर्मिती झाली खरी, पण शब्द, भाषा, कला आणि संगीत नव्हते.
तेव्हा ब्रह्मदेवांच्या मुखातून वीणा हातात घेतलेली शुभ्रवर्णी देवी प्रकट झाली, ती सरस्वती देवी. तिने जगाला ज्ञान, भाषा, संगीत आणि कला दिली. माणसाला शिकण्याची आणि समजून घेण्याची शक्ती दिली. म्हणूनच विद्यार्थी, लेखक, कलाकार प्रत्येक जण सरस्वतीला वंदन करतो. विद्या ही अशी संपत्ती आहे, जी कधी संपत नाही, उलट वाटल्यास वाढतेच.

अन्नाशिवाय जीवन नाही, म्हणून अन्नपूर्णा देवी. धनाशिवाय जीवन टिकत नाही, म्हणून लक्ष्मी देवी. ज्ञानाशिवाय जीवनाला अर्थ आहे, म्हणून सरस्वती देवी. म्हणूनच आजही आपण अन्नपूर्णा, लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवींची उपासना करतो. ही केवळ श्रद्धा नाही, तर जीवनाच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचं सुंदर प्रतीक आहे.

Leave a Reply