History of Pivali Jogeshwari pune

Navaratri 2025: लग्नाळुंच्या नवसाला पावणारी पुण्याची पिवळी जोगेश्वरी तुम्हाला माहीत आहे का? वाचा सविस्तर

News

Pivali Jogeshwari Temple History: सध्या शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्त अनेक भक्त आवर्जून देवीच्या मंदिरात जातात आणि तिची पूजा करतात. पुण्यामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत, जिथे देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवादरम्यान भक्तांची रांग लागते. पुणे शहरातील सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिर, ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी मंदिर येथे अनेक भक्त आवर्जून भेट देतात. पण, तुम्हाला पुण्यातील श्री पिवळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास माहिती आहे का? या जोगेश्वरीला पिवळी जोगेश्वरी का म्हणतात? चला तर मग जाणून घेऊ या….

Navaratri 2025:मुंबादेवीवरून मुंबई! पण मुंबा हे नाव देवीला कसे मिळाले?
Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत आहे का? जिथे अजूनही येते रामायणाची अनुभूती

पिवळी जोगेश्वरी मंदिराचा इतिहास
श्री पिवळी जोगेश्वरी मंदिर साधारणपणे ३०० वर्षांपूर्वीचे असून १९९६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होते. अशी आख्यायिका आहे की, ज्या तरुण- तरुणींचे लग्न जमत नाही, त्यांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यास त्यांचे लग्न ठरते असे म्हणतात.

पिवळी जोगेश्वरी मंदिर हे महाजन कुटुंबाचं खासगी मंदिर आहे. पिवळी जोगेश्वरी देवीची मूर्ती ही अष्टभुजा स्वरुपातील आहे. या मूर्तीजवळ गणपती आणि तांदळा स्वरुपातील देवी विराजमान आहे. नवरात्रीचे नऊ दिवस मोर, हत्ती, घोडा, गरुड, सिंह, नंदी अशा विविध वाहनांवर देवी विराजमान होते.

या देवीला पिवळी जोगेश्वरी का म्हणतात?
ज्या तरुण -तरुणींचे लग्न होत नाही, त्यांनी देवीचे दर्शन घेतलं तर त्यांच्या अंगाला लवकर हळद लागते असे मानले जाते; त्यामुळे देवीला ‘पिवळी जोगेश्वरी’ म्हणतात. तसेच देवीचे डोळे पिवळ्या स्फटिकांचे असल्यानेही देवीला ‘पिवळी जोगेश्वरी’ म्हटले जाते.

Leave a Reply