News

Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत आहे का? जिथे अजूनही येते रामायणाची अनुभूती

Navaratri 2025 Special story :नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव ! स्त्रीत्वाच्या सामर्थ्याचा महोत्सव ! प्रेम, करुणा, सामर्थ्य, तेज, शौर्य आणि त्याग म्हणजे स्त्री ! आपल्या इतिहासातील त्यागाची मूर्ती म्हणजे सीतामाई! देवींची अनेक मंदिरं असणाऱ्या भारतात सीतेचं एकही मंदिर नाही. राम-सीता-लक्ष्मण यांची एकत्रित मूर्ती असणारी मंदिरं तुम्हाला दिसतील, पण केवळ सीतेला समर्पित मंदिर कुठे दिसणार नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, सीतेचं एकमेव मंदिर या जगात आहे आणि ते श्रीलंकेत आहे, भारतात नाही.

श्रीलंकेच्या डोंगराळ आणि निसर्गरम्य नुवारा एलिया जिल्ह्यात सीता अम्मन मंदिर (Seetha Amman Temple) आहे. या मंदिराशी रामायणातील अनेक कथा जोडलेल्या आहेत, तसंच तत्कालीन अनेक खुणा या मंदिराजवळ आहेत.

Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव ! वाचा सविस्तर

Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

रामायणानुसार, दशानन रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत आणले. त्याने सीतेला आपल्या राजवाड्यात राहण्याची विनंती केली, परंतु सीतेने त्याच्यासह राहण्यास नकार दिला. तिने केवळ पती रामाच्या आगमनाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. रावणाने मग सीतेसाठी एक सुंदर बाग तयार केली,त म्हणजे अशोक वाटिका. आज या बागेला हकगला बोटॅनिकल गार्डन म्हणून ओळखलं जातं. या परिसरात अनेक रामायणकालीन खुणा आहेत.

Navaratri 2025: राजमाता जिजाऊ साक्षात जगदंबेच्या कन्या! इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !

मंदिराजवळून वाहणाऱ्या ओढ्यात सीतादेवी स्नान करत असे आणि प्रभू रामाचे स्मरण करत करत असे. मंदिरालगतच्या खडकांवर असलेले गोलाकार ठसे हनुमानाच्या पावलांचे चिन्ह मानले जातात. याच ठिकाणी प्रभू हनुमानाने सीतेला प्रथम भेट दिली आणि रामाची अंगठी देऊन तिला आश्वस्त केले.
या पौराणिक घटनांमुळे सीता अम्मन मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नसून रामायणातील सजीव अध्यायाचे प्रतीक मानले जाते.

मंदिराचा इतिहास

या मंदिराचा इतिहासही तेवढाच रंजक आहे. प्राचीन काळी या ठिकाणी फक्त राम, लक्ष्मण आणि सीतेचे प्रतीक असलेले दगड ठेवले होते.
नंतर, ब्रिटिशांनी श्रीलंकेत आणलेल्या भारतीय तमिळ कामगारांनी येथे सध्याचे मंदिर बांधले. विशेष म्हणजे आजही मंदिराची देखभाल मूळ श्रीलंकन तमिळ लोकांऐवजी भारतीय तमिळ समुदायच करतो. त्यामुळे सीता अम्मन मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारतीय आणि श्रीलंकन संस्कृतींचा संगमही आहे.

कसे आहे हे मंदिर
हे मंदिर नुवारा एलिया या डोंगराळ शहरापासून फक्त ८ किलोमीटर अंतरावर, पेराडेनिया-बदुल्ला-चेनकलाडी महामार्गालगत आहे. मंदिराभोवतीची हिरवीगार चहा बागा, डोंगराळ प्रदेश आणि थंड हवामान भक्तांना अध्यात्मिक सुखासह एक वेगळाच अनुभव देतात. याच्या जवळच असलेले हकगला बोटॅनिकल गार्डन (Hakgala Botanical Garden) रामायणातील अशोक वाटिका मानले जाते. येथे विविध प्रकारची झाडे, फुले आणि नैसर्गिक सौंदर्य पाहून सीता देवीने येथे कसे दिवस घालवले असतील, याची कल्पना करता येते.या परिसरात फिरताना वेगळी ऊर्जा भक्तांना जाणवते.

रामायणातच नव्हे, तर स्त्रीत्वामधील त्यागाची परिसीमा म्हणजे सीतामाई आहे. तिने केलेला त्याग, पवित्र असून दिलेली अग्निपरीक्षा, तिचे पातिव्रत्य, पवित्रता याची तोड कशालाच नाही. तिने ज्या रावणाच्या लंकेत १४ वर्षं काढली तिथे जाऊन सीतामाईचे दर्शन घेणं हा भक्तांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो…

Team Jabari Khabari

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

1 hour ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

5 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

6 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

24 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

1 day ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago