History of Mumbai : मुंबई (Mumbai) ही भारताची आर्थिक राजधानी. अनेक जण त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. आपल्या सर्वांना बॉम्बेचे मुंबई हे नाव झाल्याचे माहीत आहे. मुंबई हे नाव ही मुंबा देवीवरून मिळाल्याचेही आपल्याला माहीत आहे. पण या देवीला मुंबा हे नाव कसे मिळाले माहीत आहे का? नाही ना ! मग जाणून घेऊया समस्त मुंबईकरांच्या ग्रामदेवतेची कथा…
Navaratri 2025 : पाकिस्तानातील मुस्लिम करत असलेली नानी का हज आहे आपल्या हिंदूंचे शक्तिपीठ !
Crime Story : पत्नीने चिकन करायला दिला नकार! म्हणून पतीने उचलले टोकाचे पाऊल
Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत आहे का? जिथे अजूनही येते रामायणाची अनुभूती
मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचे मंदिर हे सध्या भुलेश्वर- काळबादेवी परिसरात आहे. मात्र हे मंदिर तत्कालीन मुंबई किल्ल्याच्या आतमध्ये उत्तर टोकास बोरी बंदराजवळ होते. मात्र त्या ठिकाणी बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वे स्थानक बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या अखेरीस ते विद्यमान जागी हलविण्यात आले.
या मंदिरामध्ये मुंबादेवी, अन्नपूर्णा आणि जगदंबा माता अशा तीन मूर्ती विराजमान आहेत. यातील मुंबादेवीचा थेट संबंध हा मूळ मुंबईकर असलेल्या आगरी- कोळी समाजाशी आहे. नवरात्रीमध्ये या देवीची विशेष राजोपचार पूजा केली जाते. मुंबादेवी वरून मुंबई या महानगराचा त्याचे नाव मिळाले असे मानले जाते. पण मग देवीला मुंबादेवी हे नाव कशावरून प्राप्त झाले?
मुंबादेवीच्या संदर्भात दोन कथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे मुंबारक नावाच्या राक्षसाने आता जो मुंबई -कोकणाचा भाग आहे, त्यावर हल्ला केलेला. मोठ्या प्रमाणावर त्याने संहार करण्यास सुरुवात केली. देवांनाही तो आवरत नव्हता. मग देवांनी दुर्गादेवीची आराधना केली. सिंहावर आरूढ झालेल्या या देवीने मुंबारक राक्षसाचा वध केला. तेव्हापासून या देवीला मुंबादेवी म्हणून ओळखले जाऊ लागले.
मुंबादेवीची दुसरी कथा १३व्या शतकातील आहे. मुबारक शहा या मुघलाने मुंबईच्या आताच्या परिसरावर आक्रमण केलेले. त्याच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी स्थानिक लोकांनी तेथील देवीची आराधना केली. आणि या देवीने प्रसन्न होऊन ग्रामस्थांचं रक्षण केलं. म्हणून ही मुंबा देवी म्हणून ओळखली जाऊ लागली.
आजही मुंबईची ग्रामदेवता मुंबा देवी आहे. नवसाला पावणारी, मुंबईचं रक्षण करणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे.
