Random News

Mumbai Police Bomb Threat : ३४ Human Bomb आणि ४०० किलो RDX ने उडवणार १ कोटी लोक; मुंबई पोलिसांना आला धमकीचा कॉल

Mumbai Bomb Threat Latest News : मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात Human Bomb पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो RDX ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली.

मुंबई पोलिसांना वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन शहरात मोठा स्फोट घडवण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने 34 गाड्यांमध्ये आरडीएक्स ठेवल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने स्वतःला लष्कर-ए-जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. धमकी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी देण्यात आल्यामुळे मुंबईसह राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, धमकीच्या संदेशात 34 गाड्यांमध्ये मनुष्य बॉम्ब वापरले जातील आणि 400 किलो आरडीएक्सचा स्फोट घडवून एक कोटी लोकांना मारले जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago