Lifestyle

Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा मोती साबण दिवाळीचा अविभाज्य भाग कसा ठरला ?

How Moti Soap Make icon of Diwali: उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली ही ओळ दिवाळी जवळ आली की रिल्स असो, जाहिराती असो सगळ्यावर ऐकू येते. खरंतर गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड व्हायला हवं, एवढं या साबणाचं मार्केटिंग केलं जातं तसेच हा साबण दिवाळीच्या दिवशी वापरण्यात येतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, दिवाळीला मोती साबणच का वापरतात? दिवाळीला मोती साबण ही सुरुवात कधी झाली? जाणून घेऊया…

हेही वाचा:

Diwali 2025: दिवाळीच्या काळात होऊ शकते ऑनलाईन फसवणूक! सुरक्षित डिजिटल पेमेंटसाठी फॉलो करा या ५ टिप्स Diwali 2025: पंजाब ते तामिळनाडू आणि कालीपूजा ते कौरिया काठी भारतात ७ प्रकारे साजरी होते दिवाळी Diwali 2025: पुण्यातील महत्त्वाच्या दिवाळी पहाट कुठे होणार आहेत ? वाचा इथे
Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवास

दीपावलीच्या दिवशी महत्त्व असतं ते उटणं लावून केलेल्या अभ्यंग स्नानाला! या स्नानात उटण्याचं महत्त्व ही पारंपरिकता आहे. पण ज्या ब्रॅण्डने स्वत:चं अस्तित्व निर्माण करत या परंपरेला नवतेची जोड दिली तो ब्रॅण्ड म्हणजे मोती साबण. आजच्या पहिल्या अंघोळीला आवर्जून अनेक कुटुंबात मोती साबणानेच अंघोळी केली जाते. बाकीच्या परंपरेप्रमाणेच मोती साबण हा बहुतांश परंपरेचा अविभाज्य भाग झालेला आहे.

कोणी तयार केला मोती साबण?
सत्तरच्या दशकात टाटा ऑइल मिल्सने या प्रसिद्ध मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. कारण चौकोनी वडय़ांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती साबण आकाराने मोठा आणि गोल होता. मोती या नावाला साजेसा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासून शाही थाट दाखवला. त्याची त्या काळी किंमत २५ रु एवढी होती. तुलनेने हा साबण वापरणं ही शाही संकल्पना झालेली.

मोती साबणाचं दिवाळीतील महत्त्व
एक काळ असा होता, जेव्हा कितीही हलाखीची परिस्थिती असली, तरी कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबण विकत घेतांना विचार करायची नाही. दिवाळीच्या किराणा यादीत मोती साबण हा नेहमीच असायचा.

सुरुवातीला ज्या जाहिरातींमधून मोती साबणाला लोकांपर्यंत आणलं गेलं, त्यात साबण मोत्यांच्या कोंदणात ठेवलेला असायचा. लोकांना ही कल्पनासुद्धा खूप नाविन्यपूर्ण वाटली होती. पण, मोती साबणाची आठवण ही दिवाळीतच का येते? हा प्रश्न पडणं साहजिकच आहे.तर अभ्यंग स्नान हे उटण्याशिवाय केलं जात नाही. उटणे ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे. अभ्यंग स्नान करतांना आधी उटणे लावले जाते.

९०च्या दशकांत बाजारात आलेल्या विविध साबणांसमोर मोतीला तग धरण्यासाठी कंपनीने ‘उटण्या’चा फ्लेवर असलेला साबण, अशी जाहिरात केली. दिवाळीचा दिवा लावतांना बाजूला असलेल्या मोती साबणामुळे अशी प्रतिमा लोकांच्या मनात नकळत तयार झाली, की मोती साबण हा खास दिवाळीसाठीच तयार करण्यात आला आहे. ९० च्या दशकातील प्रत्येकजण हा मोती साबणाकडे एक बालपणीची आठवण म्हणूनच बघतो आणि विकतही घेतो.

कशी होती छापील जाहिरात?
ऐंशीच्या दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठय़ा शिंपल्यात विराजमान मोती साबण दाखवला गेला होता. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा, अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोडला. दिवाळी आणि मोती हे नातं नव्वदीत दृढ झालं.

प्रसिद्ध जाहिरात
२०१३ मध्ये साबणाची आजही प्रसिद्ध असलेली जाहिरात आली. टिपिकल चाळीचं वातावरण, वयस्कर- तरुण – बाल अशा तिन्ही पिढय़ांचा खुबीने जाहिरातीत केलेला वापर आणि मुख्य म्हणजे ‘‘उठा उठा दिवाळी आली’’ ही पंचलाइन.. या सगळ्या गोष्टी ग्राहकांना भूतकाळात नेण्यासाठी योजल्या होत्या. ग्राहकांना भूतकाळातून वर्तमानात आणलं होतं आणि मोती साबण ही आपली जणू एक परंपरा आहे असं वातावरण तयार केलं गेलं. याच काळात सोशल मीडिया प्रभावी झाला होता. एखादं उत्पादन जाहिरातीमुळे पुन्हा कसं चर्चेत येऊ शकतं याचं मोती साबण हे उत्तम उदाहरण आहे.

आज दिवाळी आणि मोतीसाबण हे समीकरण अभेद्य आहे. उटणं, सुवासिक द्रव्य अभ्यंगस्नानात आपापल्या परीने काम करत असूनही मोती साबणाशिवाय हे स्नान अपूर्ण वाटावे इतपत या ब्रॅण्डने दिवाळीशी घरोबा केला आहे. दिवाळी म्हणजे दिवे, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे कंदील तसंच दिवाळी म्हणजे मोती साबण हे अद्वैत आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

53 minutes ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

2 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

20 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

20 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago