US Recession: अमेरिका मंदीच्या उंबरठ्यावर… “मूडीज”चा अमेरिकेला इशारा

News Trending

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इतर देशांवर टॅरिफचा बॉम्ब टाकत असतानाच त्यांच्यावरच मंदीचा बॉम्ब फुटणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. मंगळवारी “Moody’s” या जागतिक रेटिंग एजन्सीने अॅनालिटिक्सचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार अमेरिकेला गंभीर मंदीचा इशारा देण्यात आला आहे.

मूडीज अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ञ मार्क झँडी यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटले. राज्यस्तरीय आकडेवारीनुसार झँडी यांनी दिलेल्या विश्लेषणानुसार, अमेरिकेच्या जवळपास एक-तृतीयांश GDP निर्माण करणारी राज्यं सध्या मंदीत आहेत किंवा मंदीच्या संकटात सापडली आहेत.

न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीमध्ये झँडी यांन, सध्या अमेरिकन नागरिकांसाठी मंदीचा हा धोका दोन प्रकारे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. एक म्हणजे अन्न आणि दुकानात वस्तूंच्या वाढलेल्या किमती, तर दुसरे म्हणजे वस्तू व वाहतूक यांच्यासंबंधित उद्योगांमधील नोकरीवर होणारा परिणाम. रोजच्या खरेदीतील प्रत्येक गोष्टीत त्यांना किंमतीचा हा भार स्पष्ट दिसत आहे.

झँडी यांनी स्पष्ट केले की सध्या अमेरिकेला मंदीची झळ जाणवत नसली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. खर्च, नोकऱ्या आणि उत्पादन या संदर्भातील माहिती पाहता अर्थव्यवस्था मंदीकडे सरकत असल्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर झँडी यांनी अंदाज व्यक्त केला की वार्षिक चलनवाढ दर(Inflation Rate) जो सध्या 2.7%, तो पुढच्या वर्षी 3% च्या वर 4% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

झँडी यांनी त्यांच्या X अकाऊंटवर एक चार्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेची सध्याची परिस्थिती दाखवत आहे. या चार्टसोबत त्यांनी पोस्ट देखील केली आहे. यामध्ये राज्यस्तरीय आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर का आहे. विविध आकडेवारीच्या माझ्या मूल्यांकनानुसार, अमेरिकेच्या जीडीपीच्या जवळजवळ एक तृतीयांश भाग असलेली राज्ये मंदीच्या धोक्यात आहेत. असे म्हटले आहे.

Leave a Reply