सात वर्षांपासूनचा बेपत्ता पती सापडला इन्स्टा रीलमध्ये ! तोही भलत्याच बाईसोबत…

News Trending

इन्स्टाग्राम हे तर आज सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालं आहे. याच इन्स्टाग्राममुळे सात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या पतीचा एका महिलेला शोध लागला आहे. विशेष बाब म्हणजे, तिचा पती दुसऱ्या महिलेसह लग्न करुन सुखाने राहतो आहे. पतीचं हे रील पाहून सदर महिला चकीत झाली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीने आपली फसवणूक करुन दुसरा विवाह केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.

काय आहे हे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील मुरारनगर भागात आटमाऊ गाव आहे. या ठिकाणी राहणाऱ्या शीलूचं लग्न २८ एप्रिल २०१७ च्या दिवशी आटमाऊ गावातल्या जितेंद्र कुमार उर्फ बबलूशी झालं होतं. जितेंद्रने सासरच्या मंडळींकडून सोन्याची साखळी आणि अंगठी मागितली होती. मात्र, शीलूच्या घरच्यांनी याला नकार दिल्यामुळे त्याने तिला माहेरी आणून सोडलेलं. यानंतर तिने हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार नोंदवली होती. यानंतर काही महिन्यांतच जितेंद्र गायब झाल्यामुळे शीलूच्या वडिलांनी जितेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. परंतु, शोध घेऊनही त्याचा काही पत्ता लागला नाही.

कसा दिसला इन्स्टा रीलमध्ये ?

शीलूला सात वर्षांनी बेपत्ता झालेला पती इन्स्टाग्राम रिलमध्ये दिसेल असं वाटलंही नव्हतं. ती जेव्हा सहजच इन्स्टाग्राम बघत होती तेव्हा तिला जितेंद्र कुमार आणि दुसऱ्या एका महिलेचा व्हिडीओ दिसला. जितेंद्र लुधियाना येथील एका महिलेसह असून तो तिच्यासह रील बनवत होता हे शीलूला समजलं. यानंतर शीलूने पोलीस ठाणं गाठलं आणि जितेंद्रने दुसरं लग्न केलं आहे आणि आपली फसवणूक केली आहे अशी तक्रार नोंदवली आहे.

Leave a Reply