Norway मधील फोर्डे येथे झालेल्या स्पर्धेत मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा भारतीयांची मान उंचावली! जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रूपेरी यश संपादन केले. या स्पर्धेतील तिचं हे तिसरं पदक आहे. यामुळे मीराबाई विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारी तिसरी वेटलिफ्टर ठरली आहे.
या विश्वचषक स्पर्धेत मीराबाईने एकूण 199 किलो वजन उचलले. स्नॅच मध्ये तिने 84 किलो सहज पार केले, पण 87 किलोचे दोन प्रयत्न अपयशी ठरले. अशावेळी अनेकदा खेळाडू खचतात. पण मीराबाईने तिसऱ्यावेळी क्लीन अँड जर्क या ताकदीच्या शस्त्रावर लक्ष केंद्रित करत 115 किलो वजन उचलले. या यशामुळे तिने महिलांच्या 48 किलो गटात रौप्यपदक पटकावले. उत्तर कोरियाच्या री सांग गुमने 213 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर चीनच्या थान्याथनशी मीराबाईची कडवी टक्कर झाली. थान्याथनला कांस्यपदक मिळाले.
याआधी 2017 मध्ये मीराबाईने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिकलं होतं. तर 2022 मध्ये बोगोटा येथे 49 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. मीराबाई चानू ही अशी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे, तिने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकले आहे. याआधी कुंजरानी देवी आणि कर्णम मल्लेश्वरी यांनी पदके जिंकून रेकॉर्ड बनवला होता. कुंजरानी देवीने 1989, 1991, 1992, 1994, 1994, 1995, 1996, 1997 या सालांमध्ये सलग सात वेळा रौप्यपदकं पटकावली होती. कर्णम मल्लेश्वरीने 1994, 1995 मध्ये सुवर्ण आणि 1993, 1996 मध्ये कांस्य मिळवत एकूण चार पदकं जिंकली होती. या दोघींच्या परंपरेला आता मीराबाई पुढे नेत असून तिची जीत भारतीय क्रीडाक्षेत्राला प्रेरणा देणारा नवा अध्याय ठरत आहे.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…