Manika Vishwakarma wins Miss Universe India 2025 : राजस्थान येथील जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ या स्पर्धेत राजस्थानच्याच २२ वर्षीय मनिका विश्वकर्माने किताब जिंकला आहे. या आधी तिने मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४ हा अवॉर्ड जिंकलेला होता. आता मनिका थायलंड येथे होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.
उत्तर प्रदेश येथील तान्या शर्मा ही पहिली रनरअप ठरली, तर मेहक धिंग्रा आणि अमिशी कौशिक या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या रनरप ठरल्या. मनिका ही राजस्थान गंगापूरची रहिवासी असून ती दिल्ली येथे मॉडेलिंग करते. तिने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात ग्रॅज्युएशन केलेले आहे.
२०२४ चा मिस युनिव्हर्स राजस्थान हा किताब जिंकल्यानंतर तिने दिल्ली येथे मॉडेलिंगला सुरुवात केली. या वर्षाच्या अखेरीस थायलंड येथे होणाऱ्या ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेत १३०देशातील तरुणी आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करतील.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…