Random News

Mumbai Bomb Threat: मित्रावर सूड उगवण्यासाठी केला मुंबईत बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा फोन!

Bomb Blast Threats to Mumbai Police: आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असताना मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. शुक्रवारी वाहतूक पोलिसांना ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्स पेरल्याचा संदेश प्राप्त झाला होता. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर हे विघ्न आता दूर झाले आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून त्याला आता पुढील चौकशीसाठी मुंबईला आणले जात आहे.

नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा (वय ५०) आहे. तो मूळचा बिहारचा असून मागच्या पाच वर्षांपासून नोएडात राहत आहे. धमकी देण्यासाठी आरोपीने वापरलेला फोन आणि सीम कार्ड जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आता या प्रकरणाची पुढील चौकशी करतील.

आरोपीला नोएडातील सेक्टर ११३ मधून ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सांगितलेले की, तब्बल ३४ मानवी बॉम्ब मुंबईत असून ४०० किलो RDX ने १ कोटी लोक मारण्यात येतील. या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती दिली. तसेच सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.

पण बॉम्बची धमकी का ?
एफआयआरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अश्विनने त्याचा मित्र फिरोजला अडकविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. २०२३ मध्ये पाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये फिरोजने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अश्विनला तीन महिने कारावास भोगावा लागला होता. याचा सूड उगविण्यासाठी अश्विनने फिरोजच्या नावाने मुंबई वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावर धमकीचा संदेश पाठवला, अशी माहिती समोर येत आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago