महाराष्ट्रातील डिजिटलायझेशनला नवीन गती देत मीरा-भाईंदर महानगरपालिका राज्यातील पहिली मोफत WiFi उपलब्ध करून देणारी महानगरपालिका ठरणार आहे. शहराच्या प्रत्येक भागात अनलिमिटेड आणि विनामूल्य इंटरनेट मिळावे यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे आता नागरिकांना मोबाईल डेटा संपण्याची, वारंवार रिचार्ज करण्याची किंवा सार्वजनिक ठिकाणी नेटवर्क मिळण्याची चिंता उरणार नाही. कुठेही फिरा, काम करा, मनोरंजन पाहा — संपूर्ण शहर Free WiFi झोन बनणार आहे.
ही महत्त्वपूर्ण घोषणा मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या बैठकीला एमबीएमसीच्या आयुक्त राधा विनोद शर्मा, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक उपस्थित होते. शहराच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतानाच डिजिटल सुविधांच्या विस्ताराविषयीही चर्चा करण्यात आली.
सरनाईक यांनी सांगितले की मीरा रोड–भाईंदर हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून, गेल्या तीन वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 1,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, डिजिटल सेवांची मागणी आणि तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा वापर लक्षात घेता Free WiFi हा पुढचा नैसर्गिक टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला डिजिटल नेटवर्किंगमध्ये अग्रस्थान मिळवून देण्यासाठी मोफत WiFi चा व्यापक विस्तार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांना शिक्षण, माहिती, सरकारी सेवा, नोकरीच्या संधी आणि मनोरंजन यांचा मोफत, सहज आणि त्वरित वापर करता येणार असल्याने याला “प्रगतीची नव्या युगाची सुरुवात” असे वर्णन करण्यात आले.
याशिवाय राज्यातील अत्यंत दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात महत्त्वाचा करार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानंतर स्टारलिंकशी भागीदारी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले. यामुळे राज्यातील डोंगराळ, अडचणीच्या आणि पोहोचण्यास कठीण भागातही उच्च गतीचे उपग्रह इंटरनेट उपलब्ध होणार आहे.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…