राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान घेण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध स्तरांवरील निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरीस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त रमेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मनुष्यबळाची कमतरता असल्याने या निवडणुका एकाच टप्प्यात न घेता टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. मात्र कोणत्या स्तरावरील निवडणुका आधी घेतल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पद्धतीमुळे मतदारांना एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणून द्यायचे असतात. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर अशक्य असतो. ज्या ठिकाणी एकाच उमेदवाराची निवड होणार असते, तिथेच व्हीव्हीपॅटचा वापर शक्य असतो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीनचाच(EVM) वापर केला जाणार आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत आणखी एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, राज्यात 27 टक्के OBC आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निर्णयाअंतर्गत, 2022 मधील जुन्या प्रभाग रचनेनुसार व OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे OBC समाजामध्येही आनंदाचे वातावरण आहे.
राज्य सरकारने चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जाहीर करावी आणि चार महिन्यांच्या आत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर लवकरच राज्यातील 29 महापालिका, 290 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 335 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच रशियात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली…
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर रूग्णालयात उपचारांदरम्यान…
काँग्रेस खासदार राहुल गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या अवमानकारक…
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…