महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसांच्या कामाचे प्रगती पुस्तक जाहीर- पहा कोणत्या मंत्र्याला किती गुण मिळाले

News Political News

“शासन केवळ घोषणा करण्यापुरते न राहता, त्या प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी स्वीकारते, तेव्हाच लोकांचा विश्वास निर्माण होतो.” हे विधान महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसांच्या कामगिरीवरून सार्थ ठरते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत येताच नागरिकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचा निर्धार केला. घोषणांवर टीका करणाऱ्या विरोधकांनाही उत्तर देताना सरकारने कामगिरीचा आराखडाच तयार केला – तो म्हणजे ‘१०० दिवसांत ९०२ उद्दिष्टांची पूर्तता’ ही ऐतिहासिक मोहीम! आता ही १०० दिवसांची वाटचाल पूर्ण झाली आहे. आणि या वाटचालीचं प्रगतीपुस्तक सरकारने समोर ठेवलं आहे – ठोस आकड्यांसह, प्रामाणिक मूल्यांकनासह, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या कामगिरीसह!

महायुती सरकारचे पहिले १०० दिवस
महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होऊन अवघे १०० दिवस होत नाही, तोच सरकारने आपल्या कार्यक्षमतेचे ‘प्रगती पुस्तक’ जाहीर करून जनतेसमोर आपली पारदर्शकतेची बांधिलकी अधोरेखित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा हा निकाल Quality Council of India (QCI) मार्फत करण्यात आलेल्या मूल्यांकनावर आधारित आहे.

१०० दिवसांचे उद्दिष्ट: पारदर्शकता, श्यून्य गैरहजेरी आणि समस्यांचे तत्काळ निवारण
या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी पारदर्शकता, ऑनलाईन सेवा, नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण, श्यून्य गैरहजेरी आदी बाबतीत सुधारणा केल्या. या कार्यक्रमासाठी एकूण ९०२ धोरणात्मक उद्दिष्टे ठरवण्यात आली होती, त्यातील ७०६ उद्दिष्टांची यशस्वी पूर्तता झाली असून १९६ उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. हे निश्चितच प्रभावी प्रशासकीय कामगिरीचे प्रतीक आहे.

सर्वोत्कृष्ट विभाग: आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग अव्वल
सरकारच्या ४८ विभागांपैकी महिला आणि बालविकास विभाग सर्वाधिक म्हणजे ८०% गुण मिळवून सर्वोत्तम ठरला आहे. हा विभाग आदिती तटकरे यांच्याकडे असून त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून महिला आणि बालकल्याणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
त्यानंतर क्रमवारीत:
• सार्वजनिक बांधकाम विभाग – ७७.९५%
• कृषी विभाग (माणिकराव कोकाटे) – ६६.१५%
• ग्रामविकास विभाग – ६४.७०%
• परिवहन आणि बंदरे विभाग – ६३.९५%

जिल्हाधिकारी यामध्येही चंद्रपूर जिल्ह्याची बाजी
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी हे ८४.२९ गुण मिळवून राज्यात सर्वोत्तम ठरले आहेत. त्यांच्यानंतर:
• कोल्हापूर – ८१.१४%
• जळगाव – ८०.८६%
• अकोला – ७९.७१%
• नांदेड – ७८.८६%
या निकालांवरून जिल्हास्तरीय प्रशासनातही कार्यक्षमतेचा उच्च स्तर गाठल्याचे स्पष्ट होते.

महापालिका आयुक्त वर्गात उल्हासनगर महापालिकेचा ठसा
उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त हे सर्वोत्कृष्ट ठरले असून ६६.९५% गुण मिळवले आहेत. त्यांच्यानंतर:
• पिंपरी-चिंचवड – ६५.१२%
• पनवेल – ६३.७५%
• नवी मुंबई – ६२.३३%

विभागीय आयुक्त आणि पोलीस यंत्रणाही मागे नाही
• कोकणचे विभागीय आयुक्त – ७५.४३% गुणांसह अव्वल.
• पोलीस आयुक्त वर्गात मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त – ६८.४५%
• विशेष पोलीस महानिरीक्षकपदात कोकण विभाग – ७८.६६%

महायुती सरकारचे यश: कार्यक्षमतेचा नव्हे, तर लोकाभिमुखतेचा विजय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या सर्व विभागांचे अभिनंदन केले असून, “परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीत ही एक सकारात्मक पायरी आहे,” असे मत व्यक्त केले. राज्यातील ४८ पैकी १२ विभागांनी आपली १००% उद्दिष्ट पूर्तता केली असून आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. ही आकडेवारी ही शासनाच्या कार्यक्षमतेचा स्पष्ट पुरावा आहे.

महायुती सरकारचा हा १०० दिवसांचा कामाचा आढावा म्हणजे एक रिअल टाइम प्रशासनाचा आरसा आहे. आदिती तटकरे यांच्या महिला व बालविकास विभागाने यात बाजी मारली असली, तरी इतरही अनेक विभागांनी उल्लेखनीय कामगिरी करून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावला आहे. पारदर्शक व लोकाभिमुख शासनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल.

Leave a Reply