दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. दर्श अमावस्येच्या दिवशी हे पूजन केले जाते. या दिवशी संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धीची भक्तिभावे पूजा केली जाते. या लेखाद्वारे आपन लक्ष्मीपूजनाचे महूर्त आणि वेळ जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीपूजनादिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील सर्व सदस्य एकत्र बसून गणपती आणि लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मीसमोर फुले, फळे, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवला जातो. लाडू, करंजी देखील दाखवली जाते. घराघरांमध्ये दिवे लावले जातात.
लक्ष्मी म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे, तर शुद्धता, चांगुलपणा, सौहार्द आणि मानसिक समृद्धी असे देखील मानले जाते. अमावस्येच्या रात्री अंधार दूर सारण्यासाठी, लोक आपल्या घरात दिवे लावतात, ज्यामुळे “अज्ञान आणि दारिद्र्याचा अंधार श्रद्धेच्या प्रकाशाने दूर व्हावा यासाठी घरात दाराबाहेर दिवे लावले जातात. जे घर स्वच्छ व उजळलेले असते तिथेच लक्ष्मी प्रथम प्रवेश करते असे मानले जाते, म्हणून दिवाळीच्या आधी घराची साफसफाई आणि सजावट केली जाते.
मुहूर्त ट्रेडींग
यंदा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटे ते रात्री 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर यंदा ट्रेडींगचा मुहूर्त दुपारी 1 वाजून 45 मिनिट आणि 2 वाजून 45 मिनिटांपर्यंत असणार आहे.
दिवाळी हा सण समृद्धी आनंदाचे प्रतीक मानले जाते. वाईटावर चांगल्याचा विजयाचा हा उत्सव असतो. मुहूर्त ट्रेडिंग देखील याचाच एक भाग आहे. असे मानले जाते की, या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास वर्षभर लाभ होतो.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…