Ladki Bahin E KYC

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीण योजनेचे १५०० रु. हवेत ? मग आताच जाणून घ्या E-KYC ची प्रोसेस

News Political News

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी वरदान ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेतून दर महिन्याला १५०० रुपयांचा थेट लाभ महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळवून देण्यात या योजनेची मोठी भूमिका होती.

Operation Sindoor: ऑपरेशन तळ लवकरच उभारतोय;दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याची कबुली

Navaratri 2025: ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे सुरु झाला सार्वजनिक नवरात्रोत्सव ! वाचा सविस्तर

आता सरकारने या योजनेबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करणे आवश्यक आहे.” यामुळे खरोखर पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळेल आणि अपात्र लाभार्थी आपोआप वगळले जातील.

ई-केवायसी कशी कराल?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. या प्रक्रियेत खालील टप्पे पूर्ण करावे लागतील –

१. लाभार्थ्याचे नाव, पत्ता, शिधापत्रिका क्रमांक, उत्पन्न माहिती आणि आधार क्रमांक नोंदवावा लागेल.
२. वेबसाइटवर आधार क्रमांक व कॅप्चा भरल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यावी लागेल.
३. “मी सहमत आहे” या पर्यायावर क्लिक करून OTP प्रक्रिया पूर्ण केल्यावर ई-केवायसी यशस्वी होईल.

का आहे ई-केवायसी महत्वाची?

सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली नाही. मात्र शासनाने लवकरच ही प्रक्रिया सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लाभार्थींनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत राहणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेमुळे योजनेतील पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंतच १५०० रुपयांचा लाभ पोहोचेल. तसेच लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या सक्षमीकरणाचा एक ठोस टप्पा आहे. मात्र, या योजनेतील लाभ सतत मिळवण्यासाठी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

Leave a Reply