“स्टँडअप ची सीमा ओलांडली? कुणाल कामराच्या टीकेवर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर!”
वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. कामराने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी धुडगूस घालत तोडफोड केली, तर दुसरीकडे कुणाल कामराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन अपमानास्पद टीका करणाऱ्या लोकांना धडा शिकवला जाईल.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सांगितले,
“स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते, आम्ही त्याला दादही देतो. पण सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला जाणार नाही. कोणीही कितीही दबाव आणला तरी कठोर कारवाई केली जाईल.”
तसेच, फडणवीस यांनी कामराच्या विचारसरणीवर टीका करत त्याला ‘अर्बन नक्षल’ असे संबोधले. ते म्हणाले, “डाव्या विचारसरणीचे लोक, जे देशातील संस्था आणि व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करण्याचे काम करतात, त्यांना सोडणार नाही.”
माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कुणाल कामराला धारेवर धरले. त्यांनी सांगितले,
“कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे, हे २०२४ च्या निवडणुकीत जनतेने स्पष्ट केले आहे. तुम्ही विनोद करा, व्यंग करू शकता, पण अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर सहन केला जाणार नाही.”
फडणवीस पुढे म्हणाले,
“कामराने संविधानाचे पुस्तक दाखवले, पण ते जर त्याने खरेच वाचले असेल तर त्यातच लिहिले आहे की कोणाच्याही स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे कामराने त्वरित माफी मागावी.”
कुणाल कामरा हा आपल्या तिखट राजकीय व्यंगासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली आहे. त्याच्या काही मोठ्या वादग्रस्त घटनांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत –
कुणाल कामराच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले असून, फडणवीस यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. “स्टँडअप कॉमेडी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामधील सीमारेषा नक्की कशी ठरणार?“ हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…