गेल्या काही महिन्यांपासून कॅटरिनाकडे गूड न्यूज असल्याच्या बातम्या पाहायला मिळत होत्या. यावर अनेक चाहते तर्क वितर्क लावत होते. मात्र आता खुद्द कतरिना आणि विकीनेच या बातमीवर शिक्का मोर्तब केला आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
इंस्टाग्रामवरील या फोटोमध्ये, आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाने आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्यायाची सुरूवात करणार आहोत. “On our way to start the best chapter of our lives with hearts full of joy and gratitude. ” असे कॅप्शन तिने लिहिले आहे.
