katrina-kaif-pregnant-vicky-kaushal

Katrina Kaif pregnancy: आताच्या Lifestyle मध्ये चाळीशीनंतरही होऊ शकते नैसर्गिक गर्भधारणा?

Lifestyle News Trending

Katrina Kaif Pregnancy: बॉलीवूडचं लोकप्रिय कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर या दोघांनी पहिल्या प्रेग्नसीची न्यूज ऑफिशिअली दिली आहे. या कपलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Navaratri 2025:मुंबादेवीवरून मुंबई! पण मुंबा हे नाव देवीला कसे मिळाले?
आता QR कोड पेमेंट बंद!फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?

कतरिना होणार चाळीशीनंतर आई

कतरिना कैफ ही या वर्षी जुलैमध्ये ४२ वर्षांची झाली. तिच्यामुळे इतर महिलांना नवीन आशा मिळणार आहे की, आई होण्यासाठी उशीर झाला असला तरी या वयातही गर्भधारणा होऊ शकते. अनेक डॉक्टरांच्या मते, वय वाढल्यावर प्रजनन क्षमता(फर्टिलिटी रेट) कमी होतो.

आजकाल मासिक पाळी मुलींना लवकर येते. तेव्हा अंडाशयात म्हणजे ओव्हरीमध्ये विशिष्ट संख्येने अंडी असतात, त्यांची संख्या मर्यादित असते. दर महिन्याला जशी पाळी येते तशी या अंड्यांची संख्या कमी होत जाते. त्यामुळे महिलांना गर्भधारणेची संधी पुरुषांपेक्षा कमी वयापर्यंत असते. आताच्या लाईफस्टाईलमध्ये, डाएटच्या चुकीच्या सवयी यामुळे ३५ वयानंतर नैसर्गिकरित्या मूल होणं, आणि ते व्यवस्थित असणं याची शक्यताच कमी होते, ४० ते ४४ वयादरम्यान प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात गर्भधारणेची शक्यता फक्त पाच टक्के राहते आणि ४५ वर्षांनंतर ती फक्त एक टक्क्यावर येते.
असे अनेक फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत असते.

गर्भधारणा करण्याचा विचार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

वयाच्या चाळीशीनंतर गर्भधारणा करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.स्त्रीरोग तज्ज्ञाकडून एकदा आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, जर उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडसारखे आजार आधीपासून असतील, तर त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. दोन्ही जोडीदारांची लैंगिक आजारांसंबंधीची तपासणी करणेही आवश्यक आहे. तसेच कुटुंबात वंध्यत्वाचा इतिहास किंवा काही आनुवंशिक आजार असतील, तर त्याबाबतचेही मूल्यमापन करणे गरजेचे आहे.
तसेच जीवनशैलीतील गोष्टींवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जास्त वजन असल्यास ते कमी करण्यासाठी आणि ‘फिट’ राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

धूम्रपान, तंबाखूचे सेवन, मद्यपान, उशिरापर्यंत जागरण व ताणतणाव या सवयी टाळायला हव्यात. तसेच फॉलिक अॅसिड, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 व व्हिटॅमिन D यांनी भरलेला संतुलित आहार घ्यावा आणि दिवसाला किमान आठ-नऊ तास झोप घ्यावी. कमी ताण आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, मन प्रसन्न ठेवणेही आवश्यक असते.

गर्भधारणेचा विचार करण्याआधी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply