Kantara Movie 2025

Kantara History: ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आलेले पांजुर्ली-गुलिगा देव आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा अद्भुत इतिहास

Entertainment News Trending

Kantara Chapter 1 myths: ‘कांतारा’ हा चित्रपट मागील आठवड्यात रिलीज झाला. २०२२ मध्ये रिलीज झालेला त्याच्या प्रीक्वलमुळे लोकांना कांतारा चाप्टर १ ची प्रचंड उत्सुकता होती. ‘कांतारा वन’मध्ये काय कथा असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ‘कांतारा’मध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांना पांजुर्ली देवता दाखवली होती. त्याची ताकद दाखवली होती. पण आता ‘कांतारा’च्या प्रीक्वलमध्ये प्रेक्षकांना पांजुर्ली देवता आणि गुलिगा देवता यांची कथा पाहायला मिळाल्या. पांजुर्ली देवता आणि गुलिगा देवता कांताराच्या कथेचा एक महत्त्वाचा भाग होता. तो कथेचा मुख्य कणा होता असं म्हणता येईल आणि आता त्याची संपूर्ण कथा ‘कांतारा पार्ट १’ मध्ये पाहायला मिळणार आहे. काय होता या दोन देवतांचा इतिहास

या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून लोकांनी त्याची कथा आणि पात्रांबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती. हे पांजुर्ली आणि गुलिगा देव नेमके कोण आहेत, त्यांचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकही उत्सुक होते. अभिनेता ऋषभ शेट्टी ‘कांतारा चॅप्टर वन’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटाचाही दिग्दर्शकही आहे. त्यानेच ‘कांतारा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि अभिनयही केला होता. तो चित्रपटात शिवाच्या भूमिकेत दिसला होता.

पांजुर्ली देवता कोण आहे?
याबद्दल इंटरनेटवर अनेक कथा उपलब्ध आहेत. त्यानुसार पांजुर्ली देवता हा भगवान विष्णूचा वराह अवतार असल्याचं म्हटलं जातं, ज्याची कन्नड भाषिक लोक पूजा करतात. कर्नाटक आणि केरळच्या अनेक भागात पांजुर्ली देवतेची पूजा केली जाते. येथील लोकांची पांजुर्ली देवावर श्रद्धा आहे. तेथे पांजुराली देवता त्यांचे रक्षण करते असे मानले जाते. या भागात दैव कोला नावाचा सणही साजरा केला जातो, ज्यामध्ये तेथील लोक पांजुर्ली देवतेच्या वेशभूषेत नाचतात.

गुलिगा हे देवाचे उग्र रूप
‘कांतारा’मध्येही तेच दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ऋषभ शेट्टीच्या पात्रात पांजुर्ली देवता येतो आणि मग तो सर्व शत्रूंचा बदला घेतो आणि त्यांना ठार मारतो. मात्र, ‘कांतारा’मध्ये गुलिगा देवतेची कथा दाखवण्यात आली नव्हती. पण ती कथा ‘कांतारा चॅप्टर वन’मध्ये दाखवण्यात येणार आहे. गुलिगा हे देवाचे उग्र रूप मानले जाते. ‘कोरा’ या वेबसाइटनुसार, एकदा माता पार्वतीने महादेवासाठी राख आणली होती, मात्र त्यात एक खडा आला होता.
महादेवाने तो खडा पृथ्वीवर टाकला आणि त्यातून गुलिगा देवता जन्माला आली. हे त्यांचे उग्र रूप होते. असे म्हणतात की एकदा पांजुर्लीली देवता आणि गुलिगा देवता यांच्यात युद्ध झालं होतं. तेव्हा मात्र देवी दुर्गेला त्यांच्यात यावं लागलं आणि तिने हे युद्ध थांबावंलं. तसेच त्यांनी एकत्र राहावे, असे देवीने आदेश दिले. तेव्हापासून, दैव कौला उत्सवात, लोक गुलिगा आणि पांजुर्ली देव म्हणून वेशभूषा करतात आणि ते दोघे देव मित्र असल्याचं दाखवतात.

Leave a Reply