Photo: रेड कार्पेटवर अभिनेत्रीचा जलवा; ब्लॅक अँड व्हाईट विंटेज लूकवर चाहते घायाळ

Lifestyle News

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिचे रेड कार्पेटवरील काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. नेहमीप्रमाणेच तिच्या अनोख्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टोरोंटो आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) मध्ये तिच्या होमबाऊंड या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी तिने खास मियू मियू (Miu Miu)गाऊन घातला होता. तिचा हा विंटेज लूक चाहत्यांना आवडला असून तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

जान्हवीने घातलेला गाऊन White असून त्यावर काळ्या रंगाचे ठिपके आहेत. गाऊनला चांगला फ्लो आहे. वन शोल्डर नेकलाइनमुळे ड्रेस अधिक उठावदार दिसत आहे. या लूकची खासियत म्हणजे तिने घातलेले अॅक्सेसरीज. एका बाजूला तिने फेक फर स्टोल घेतला होता, त्यावर ग्लिटरिंग ब्रोश लावले होते.

जान्हवीचा हा लूक तिचा मेकअप आणि हेअरस्टाईलमुळे अधिक उठुन दिसत होता. हेअरस्टायल स्टायलिस्ट मार्से पेद्रोझो यांनी केली होती, तर मेकअप सव्हलीन मांचंदा यांनी केला आहे. या फोटोंसोबत तिने “Feeling like a princess wearing my fav miumiu” असे म्हटले आहे.

Leave a Reply