दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण करणारे जय जवान पथक सगळ्यांच्याच माहितीत आहे. हंडी फोडताना पथकाची शिस्त आणि प्रत्येक थरात दिसणारे साम्य यामुळे या पथकाची चर्चा सर्वदूर पोहोचली आहे. मात्र या पथकाला यावर्षी प्रो-गोविंदा लीगमध्ये संधी नाकारण्यात आली आहे. यामुळे पथकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
5 जुलै रोजी ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात जय जवान गोविंदा पथक सहभागी झाले होते. पथकाने वरळी डोम परिसरात ठाकरेंना सलामी दिली होती. तसेच राज ठाकरे यांच्या मीरारोड मधील मोर्चा दरम्यान देखील पथकाने सलामी दिली होती. त्यामुळे त्यांना प्रो गोविंदासाठी प्रवेश डावलल्याचा संशय पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी व्यक्त केला. विजयी मेळाव्यात सलामी देणं पथकाला नडलं की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे.
नेमकं काय घडलं?
प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो. मात्र यंदा जय जवान पथकाने 3 मिनिटे उशिराने अर्ज दाखल केल्याने त्यांना अपात्र ठरवत त्यांचा अर्ज नाकारण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रो-गोविंदा लीगचे आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार करण्यात आली आहे. ज्या 32 संघानी पहिली नोंदणी केली, त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वैमनस्क्यातून प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे आरोप निराधार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे महानगरपालिकेची प्रतिष्ठीत वर्षा मॅरेथॉन पुन्हा नव्या उर्जेसह दि. 10 ऑगस्ट 2025…