News

Crime Story : Insta वरील प्रेमाचा भयानक शेवट! मृतदेह सुटकेसमध्ये भरून काढला सेल्फी!

boyfriend killed 20 year old woman clicks selfie with suitcase before dumping body Crime News : एका २० वर्षीय तरूणीची हत्या केल्याप्रकरणी कानपूर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. या तरूणीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून ९५ किलोमीटर दूर बांदा येथे यमुना नदीत फेकून देण्यात आला होता. हा प्रकार उजेडात आल्यानंतर फतेहपूरच्या हरिखेडा येथील इलेक्ट्रिशन सूरज आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा त्याचा मित्र आशिष या दोघांना अटक करण्यात आली आहे. हत्येची घटना ही २१ जुलै रोजी कानपूरच्या हनुमंत विहार येथे घडली होती.

Love Bite करताय ? थांबा ! यामुळे येऊ शकतो Brain stroke ! वाचा सविस्तर

Viral Video : Foreigner सोबत रिक्षावाल्याने साधला फ्रेंचमध्ये संवाद आणि व्हिडीओ व्हायरल झाला; पहा व्हिडीओ

पीडित तरूणी आकांक्षा तिची मोठी बहीण प्रतिक्षाबरोबर बर्रा येथे राहत होती. वर्षभरापूर्वी तिची सूरज याच्याबरोबर इंस्टाग्रामवरून मैत्री झाली. सुरजने तिला बर्रा येथे एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवून दिली आणि नंतर तिने हनुमंत विहार येथील दुसऱ्या एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करावी असे त्याने सुचवले.

Navaratri 2025: राजमाता जिजाऊ साक्षात जगदंबेच्या कन्या! इतिहासात पहिल्यांदाच घडला देवीचा चमत्कार !

त्यानंतर आकाक्षा एका सूरजने बघून दिलेल्या प्रमोद तिवारी यांच्या घरातील भाड्याच्या खोलीत राहायला गेली, जेथे तो तिला भेटू शकत होता. या दोघांच्या नात्याबद्दल पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजचे दुसर्‍या एका महिलेबरोबर संबंध समोर आल्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाले.

या दोघांमध्ये रेस्टॉरंटमध्ये वाद झाला, त्यानंतर घरी देखील भांडण झाले. जेथे सूरजने कथितपणे गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मित्र आशिष याला फोन केला.

त्यानंतर या दोघांनी आकांक्षाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि तो घेऊन बांदा येथील चिल्ला घाट येथे घेऊन गेले आणि त्यानंतर सूटकेस त्यांनी यमुना नदीत फेकून दिली. पोलिसांनी सांगितले की, सूटकेस फेकून देण्याच्या आधी त्यांनी त्याबरोबर सेल्फी काढून ती ऑनलाईन पोस्ट केली. पण याबद्दल त्यावेळी कोणालाही संशय आला नाही.

नेमकं काय घडलं?
आकांक्षांची आई विजयश्री म्हणाल्या की, मुलीचा फोन २२ जुलै रोजी बंद झाला. तिला शोधण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र बर्रा आउटपोस्ट आणि पोलीस कमिश्नर कार्यालयाला भेटी देऊनही हरवल्याची तक्रार ८ ऑगस्टपर्यंत दाखल करून घेण्यात आली नाही. १६ सप्टेंबर रोजी विजयश्री यांनी सूरजच्या विरोधात तक्रार दाखल केली ज्यामुळे तपास करण्यात आला आणि अखेर पोलि‍सांनी त्याला अटक केली.

कॉल डिटेल रेकॉर्ड आणि मोबाईल लोकेशन डेटा यांच्या माध्यमातून पोलिसांनी पुष्टी केली की आकांक्षा आणि सूरज हे हत्या झाली त्या रात्री सोबत होते, त्यानंतर सूरजने गुन्ह्याची कबुली दिली.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

2 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

3 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

21 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

22 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago