Entertainment

राज कपूर यांची अनोखी शक्कल

कुठलाही चित्रपट जेव्हा येतो तेव्हा, कुठलाही अभिनेता मोठा होतो तेव्हा त्याच्या भोवती अनेक दंतकथा जोडल्या जातात. अश्याच काही कथा होत्या राज कपूर यांच्या. अर्थात या दंत कथाच त्यामुळे त्या किती खऱ्या आणि किती खोट्या सांगता येत नाहीत. पण अशीच एक कथा आज आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी.

राज कपूर यांचा इंडस्ट्री मध्ये दबदबा होता त्या काळातील गोष्ट. “मेरा नाम जोकर” हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट. स्वतःचं सगळं म्हणजे पैसा, कष्ट, इतकच काय तर स्वतःचा स्टुडीओ सुद्धा त्यांनी या चित्रपटासाठी गहाण टाकला होता. चित्रपटाचं शूट तर पूर्ण झालं होतं पण रिलीज डेट काही कोणाला माहिती नव्हती. राज कपूर यांच्याकडून “पोस्ट प्रोडक्शन झालं की करू रिलीज” हे ठरलेलं उत्तर देण्यात यायचं.  आणि सर्वांनाच, खास करून इतर निर्मात्यांना हवी होती मेरा नाम जोकरची रिलीज डेट. कारण राज कपूर the showman यांचा दबदबाच असा होता की त्यांचा चित्रपट येणार असेल तेव्हा बाकीचे निर्माते स्वतःच्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलायचे. आणि याचं कारण म्हणजे राज कपूरच. 

तर या लांबलेल्या पोस्ट प्रोडक्शन मुळे अनेक वेळा रिलीज डेट पुढे ढकलली गेली. असं कितीतरी वेळा चालत राहिलं. इतर निर्माते सुद्धा या सगळ्याला वैतागले होते. सुरवातीला ते राज कपूर यांचा आदर ठेऊन शांत होते, पण नंतर नंतर ते सुद्धा कंटाळले. एकदाची काय ते तारीख सांगून टाका म्हणजे आम्हाला आमच्या रिलीजचं नियोजन करता येईल असं इतर निर्माते म्हणू लागले. त्यांच्या कांटाळ्याची जागा आता रागाने घेतली होती आणि याचा बदला निर्मात्यांनी घेतलाच. 

१८ डिसेंबर १९७० फायनली जेव्हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा अनेक निर्मात्यांनी अनेक थियेटर मधले सगळे तिकिटं विकत घेतले. त्यामुळे झालं असं की तिकीट खिडकीवर जरी हाउसफुलचे बोर्ड दिसत असले तरीही आतमध्ये मात्र २० २५ माणसं बसलेली दिसायची. आणि ती सुद्धा याच निर्मात्यांनी बसवलेली होती. ही माणसं चित्रपट चालू झाला की तासाभराने बाहेर यायची आणि यार कितना बकवास movie बनाया है, क्या फालतू सिनेमा है अशी वाक्य बोलायची. ही वाक्य सगळीकडे पसरू लागली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला, हा चित्रपट पडला. राज कपूर यांच्यासाठी हा मोठा धक्का होता, ज्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच काळ लागला. दरम्यान त्यांना इतर निर्मात्यांनी केलेली ही चाल समजली. 

नंतर जेव्हा त्यांचा बॉबी चित्रपट आला तेव्हा त्यांनी हीच शक्कल आपल्या फेवर मध्ये वापरण्याचं ठरवलं. त्यांनी स्वतःच स्वतःच्या चित्रपटाची सर्व तिकिटं विकत घेतली आणि चित्रपटगृहात स्वतःच्या जवळची लोकं, नातेवाईक, मित्र यांना नेऊन बसवलं. आणि या लोकांनी चित्रपट बघून या चित्रपटाचं जोरदार कौतुक सुरु केलं. तिकीट मिळत नाहीये, त्यात लोकांनी केलेलं कौतुक यामुळे पब्लिक तिकीट खिडकीवर तुटून पडली वाट्टेल ते पैसे मोजून तिकीट घ्यायला तयार झाली. आणि बघता बघता या सिनेमाने मोठ्ठा गल्ला कमवला. अर्थात या चित्रपटाच्या स्टोरीचं, कलाकारांचं श्रेय होतंच पण दंतकथेप्रमाणे राज कपूर यांनी लढवलेली शक्कल सुद्धा कामी आलेली. 

बॉबी सिनेमातील ऋषी कपूर आणि डिंपल यांची जोडी, त्यातली गाणी तर फेमस झालेलीच पण सोबतच या चित्रपटात दाखवलेली राजदूत गाडी सुद्धा बॉबी नावाने प्रसिध्द झाली. इतकं यश या चित्रपटाला मिळालं. 

The Man The Myth The Legend असलेल्या राज कपूर यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून अश्या चित्रपटांच्या मसालेदार स्टोरी माहिती असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा.

Admin

Recent Posts

Rahul Gandhi:राहुल गांधींच्या वोटचोरी आरोपांचा पर्दाफाश! जाणून घेऊया पूर्ण सत्य

BJP vs Congress Vote theft : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील…

43 minutes ago

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

3 hours ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

6 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

7 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

1 day ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

1 day ago