Sports

Asia Cup 2025:बाप तो बाप ही रहेगा! पाकिस्तानी चाहत्याने काढले पाकिस्तानी संघाचे वाभाडे; पहा व्हिडीओ

India Won Asia Cup 2025 Final against Pakistan: आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला आणि भारतात दिवाळीच्या एक महिना आधीच दिवाळी साजरी झाली. आख्ख्या स्पर्धेत न खेळलेल्या रिंकू सिंहनं विजयी फटका मारला आणि भारतीय संघानं एकच जल्लोष केला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानचा संघ व संघातील खेळाडूंना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाच्या चाहत्यांकडूनच आपल्या संघाच्या कामगिरीवर तोंडसुख घेतलं जात आहे. पाकिस्तानच्या अशाच एका चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Asia Cup Trophy: करारा जवाब! भारतीय संघाचा आशिया चषक स्वीकारण्यास नकार

Asia Cup 2025: मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच ! भारताच्या विजयावर पहा काय आल्या प्रतिक्रिया

नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात दमदार झाली. दोन्ही सलामीवीरांनी पाकिस्तानला ८४ धावांची सलामी दिली. पण त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि २० षटकांमध्ये पाकिस्तानला फक्त १४६ धावा करता आल्या. विजयासाठी १४७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं ५ गडी राखून पाकिस्तानला नमवलं आणि आशिया चषक आपल्या नावावर केला.

दरम्यान, पाकिस्तानच्या पराभवावर त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाल्याचं दिसत आहे. एका चाहत्यानं एका व्हिडीओमध्ये दिलेल्या प्रतिक्रियेत पाकिस्तान संघाला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. “बाबर आझम सोडा, आख्खा पाकिस्तान भारताशी खेळला तरी आपण भारताला हरवू शकत नाही. आपली लायकीच नाहीये त्यांच्याविरुद्ध जिंकायची. आपल्याला त्यांनी असा काही धडा शिकवलाय की आपल्या कितीही पिढ्या जन्माला आल्या, तरी आपण भारताला पराभूत करू शकत नाही. भारत आपला बाप होता आणि बाप राहणार”, अशा शब्दांत या चाहत्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

पराभवासाठी थेट सरकारलाच लक्ष्य केलं

आम्ही कधीपर्यंत रडायचं. आमच्या पाकिस्तानमध्ये दुसरा कुठलाच आनंद नाही. एक क्रिकेट आहे, पण त्याचीही या लोकांनी पार वाट लावून टाकली आहे. मूर्खांना टीममध्ये घेऊन फिरतोय आपण. हुसैन तलत कॅच सोडतोय, त्याला संघात घेऊन फिरतोय आपण. आम्ही काय करायचं? कुठे जायचं? मला पाकिस्तान सरकारकडून उत्तर हवंय, असं म्हणत या चाहत्यानं आशिया चषकातील पराभवासाठी थेट पाकिस्तान सरकारलाच लक्ष्य केलं!

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

49 minutes ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

2 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

20 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

20 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago