India Refuse to Accept Asia Cup Trophy
India vs Pakistan Asia Cup 2025 Final Trophy Controversy: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत स्पर्धेचे आपले नववे विजेतेपद पटकावले. मात्र विजयाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
Navaratri 2025 :कोकणस्थांची कुलदेवी बीडची अंबेजोगाई कशी झाली? वाचा योगेश्वरीची अद्भुत कथा
सामन्यानंतर जवळपास तासभर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. पण भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन तसेच पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची विजयानंतरची मुलाखतही घेण्यात आली नाही.
कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक सायमन डुल यांनी भारतीय संघ आज रात्री आपली पारितोषिकं स्वीकारणार नसल्यामुळे हा पारितोषिक समारंभ इथेच संपतो, असे जाहीर केले. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिकं स्वीकारली, परंतु संपूर्ण संघाने ट्रॉफी उचलण्यासाठी किंवा सामूहिक छायाचित्रासाठी मंचावर जाण्यास नकार दिला.
यावेळी आणखी एक विचित्र प्रसंग घडला. सामना संपून जवळपास एक तास उलटूनही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नव्हते. प्रोटोकॉलनुसार मोहसिन नक्वी यांना पारितोषिक वितरण करायचे होते, पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते. जवळपास ५५ मिनिटांनी अखेर सलमान आघा आणि त्याचे सहकारी मैदानावर आले. पण त्यांचे स्वागत “इंडियाआ… इंडियाआ…” अशा जोरदार घोषणांनी झाले.
भारताचा विजय निश्चित होताच चर्चेला उधाण आले होते की, भारतीय खेळाडू ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊ शकतात. कारण नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि मंत्री असून भारतविरोधी भूमिकेसाठी ते ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांत नक्वी यांनी ‘एक्स’वर दोन व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोल सेलिब्रेशनसोबत विमान अपघाताचे दृश्य दाखवले गेले होते. अगदी असाच इशारा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने भारताविरुद्ध २१ सप्टेंबरला झालेल्या सुपर-४ सामन्यात दिला होता. त्याबद्दल त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…