भारतीय संस्कृतीत अगरबत्ती म्हणजे पुजाविधीतील एक अविभाज्य घटक मानला जातो. प्रत्येक मंदिरात, घरात किंवा धार्मिक कार्यात अगरबत्तीचा वापर अगदी सहज दिसून येतो. पूर्वीच्या काळी धूपाची अगरबत्ती अथवा उदबत्ती बनवली जात असे. यामागे नाकावाटे धूप शरीरात गेल्यास त्याचे औषधी परिणामांमुळे शरीरसुद्धा निरोगी राहण्यास मदत होत असे. धूप लावल्याने त्याचा सुगंध मनाला शांतता देतो, आणि वातावरणात सकारात्मकता निर्माण करतो. परंतू अलिकडे बाजारात मिळणाऱ्या अगरबत्त्यांमध्ये अनेक रसायने मिसळलेली असतात.
अगरबत्तीच्या या सुगंधासोबत येणारा धूर मात्र आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. साउथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि चायना टोबॅको ग्वांगडोंग इंडस रेल्वे कंपनी यांच्या संयुक्त अभ्यासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतो असे सांगितले जात आहे.
या रिसर्चमध्ये अगरबत्ती आणि सिगारेटच्या धुराची तुलना करण्यात आली. यामध्ये अगरबत्तीच्या धुरात तब्बल 99 टक्के अतिसूक्ष्म कण आढळतात जे शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. हे कण हवेत मिसळून आपल्या श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि शरिरातील पेशींवर परिणाम करतात.
अगरबत्तीतून निघणाऱ्या धूरात म्युटेजेनिक, सायटोटॉक्सिक आणि जीनोटॉक्सिक आढळून आले आहे. हे पदार्थ थेट आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतात. त्यांच्यामुळे फुफ्फुसातील पेशींमध्ये बदल होतो, जळजळ होते यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याबरोबरच या धुरातील रसायनांमुळे डोळ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो. डोळ्यांमध्ये खाज, जळजळ आणि दृष्टी कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…