यावर्षी पुणेकरांसाठी पाच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये रसिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांचा अनुभव घेण्याची संधी विनामूल्य मिळणार आहे.
Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवास
बसचालकाला हार्टअटॅक अन् सलग ९ गाड्यांना धडक, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल
दिवाळी म्हटलं की… मंत्रमुग्ध करणारी दिवाळी पहाट आलीच यावर्षी पुणेकरांसाठी पाच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये रसिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांचा अनुभव घेण्याची संधी विनामूल्य मिळणार आहे. यावर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम कुठे कुठे आयोजित होणार आहेत, याविषयी अधिक माहिती घेऊ
दिवाळीच्या आनंदात भर घालणारी संगीताची मेजवानी येत्या 18 ऑक्टोबरला पहाटे 5.30 वाजता श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडासंकुल येथे रंगणार आहे. या दिवाळी पहाट कार्यक्रमात पद्मश्री सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचे सुमधुर सादरीकरण रसिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
हडपसरवासीयांसाठी यंदाची दिवाळी पहाट खास ठरणार आहे. येत्या 19 ऑक्टोबरला पहाटे 5.30 वाजता विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम येथे संगीताची सुंदर मेजवानी रंगणार आहे. या कार्यक्रमात पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे, आर्या आंबेकर आणि रमाकांत गायकवाड यांचे सुमधुर सादरीकरण होणार आहे.
बालेवाडीत होणारी यंदाची दिवाळी पहाट रसिकांसाठी खास ठरणार आहे. या कार्यक्रमात पद्मश्री शुभा मुद्गल, नीलाद्री कुमार आणि सत्यजित तळवलकर या दिग्गज कलावंतांचा मनमोहक कलाविष्कार अनुभवता येणार आहे.हा कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30 वाजता, सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, एस. के. पी. कॅम्पस, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
21 ऑक्टोबर, पहाटे 5:30 वाजता, अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती, सातारा रोड येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी रसिकांना तीन दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभवता येणार आहे. पं. शौनक अभिषेकी, विदुषी मंजूषा पाटील आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे सादरीकरण या दिवाळी पहाटेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
तीन आघाडीचे कलाकार एकत्र येतात, तेव्हा रसिकांसाठी निर्माण होतो एक अस्मरणीय क्षण.22 ऑक्टोबर, पहाटे 5:30 वाजता, कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स मध्ये होणाऱ्या दिवाळी पहाटेत रसिकांना खास अनुभव मिळणार आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण पं. विश्व मोहन भट यांच्या मोहन वीणेचे स्वर, पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याची झंकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांचे भावपूर्ण गायन ऐकायला मिळणार आहे.
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…