News

नरकचतुर्दशी – अभ्यंगस्नानाची पौराणिक कथा

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे एक वेगळे महत्व आहे. धनत्रयोदशीनंतर येते नरकचतुर्दशी. हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून निरपराध स्त्रियांची सुटका केली त्यानंतर हा दिवस “नरकासुराचा वध” झाला याचा आंनद साजरा करण्यासाठी केला जाऊ लागला. आजही लोक पहाटे स्नान करून, दिवे लावतात आणि अंध:काराचा नाश होऊन नव्या आशेचा प्रकाश फुलावा अशी प्रार्थना करतात.

भागवत पुराणानुसार, नरकासुर नावाचा बलाढ्य असुर प्राग्ज्योतिषपुर (आत्ताचे गुवाहाटी) राज्याचा अधिपती होता. तो अत्यंत पराक्रमी, पण निर्दयी आणि दुष्ट स्वभावाचा होता. नरकासुराने इंद्राचे राज्य हडपले होते, तसेच देव अदितींची कुंडले चोरली होती. अमरपर्वतावरील मणिपर्व हे स्थान देखील बळकावले होते. देवांसहित मानव देखील त्याच्या अत्याचारांनी हैराण झाले होते. मणिपर्वतावर त्याने एक मोठा महल बांधला होता. या महलात त्याने चोरून आणलेल्या 16 हजार एकशे उपवर महिलांना कोंडून ठेवण्यात आले होते. महालामध्ये प्रत्येक स्त्री साठी रत्नजडित मंदिर देखील बांधले होते. या मंदिरात त्या स्त्रियांशी लग्न करण्याचा त्याचा बेत होता.

ही माहिती जेव्हा श्रीकृष्णाला कळली, तेव्हा त्याने मणिपर्वतावर जाऊन नरकासुराशी युद्ध केले. या युद्धात श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, व 16 हजार एकशे स्त्रियांची सुटका केली. यानंतर त्या महिलांनी नरकासुराने आमचे अपहरण केले त्यामुळे आता आमचा कुणी स्वीकार करणार नाही, त्यामुळे महिलांनी श्रीकृष्णाकडे त्यांना वरण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह करण्याचे वचन दिले. या घटनेनंतरच श्रीकृष्णाच्या 16 हजार 108 पत्नी होत्या अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच नरकासुराने देवतांकडून चोरलेली रत्ने व मौल्यवान वस्तू श्रीकृष्णाने ज्यांच्या त्यांना परत केल्या.

हे रात्रप्रहरी झाले उष:काळी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून, त्याच्या रक्ताचा टीळा कपाळी लावला. पुन्हा मथुरेत परतल्यानंतर नंदाने त्याला मंगल स्नान घातले. स्त्रियांनी जागोजागी दिवे लावले. काहींनी गोड पदार्थ करून आनंद व्यक्त केला. या घटनेनंतर सगळीकडे आनंदोस्तव साजरा करण्यात आला. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही नरकचतुर्दशी साजरी करण्यात येते.

या दिवशी अभ्यंगस्नान म्हणजे सूर्य उगवण्याआधी उटणं लावून अंघोळ करण्यात येते. ज्यामुळे शरीराला तेज येते आणि आरोग्यही चांगले राहते. नरकासूर वधाच्या स्मरणार्थ कारीट नावाचे हिरवे फळ पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. कारीट म्हणजे अंहकार आणि वाईट प्रवृत्तींचा नाश. असे मानले जाते की या स्नानाने शरीरशुद्धी आणि मनशुद्धी होते.
संध्याकाळी अंगणात किंवा घराबाहेर रांगोळी काढून दिव्यांची आरास केली जाते.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

57 minutes ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

2 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

20 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

21 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago