Lifestyle

कॅन्सर झालाय हे लवकरात लवकर कसे ओळखायचे?

कॅन्सरचे नाव काढले तरी अनेकजण घाबरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, लक्षणे दिसण्यापूर्वीच आपण कसं ओळखू शकतो ते? कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी काही स्क्रिनिंग टेस्ट आहेत, जसे की..

मॅमोग्राफी, ब्रेस्ट कॅन्सर साठी सर्वात प्रभावी टेस्ट. ४० वर्षांवरील महिलांनी ही चाचणी दरवर्षी किंवा दोन वर्षांनी करणे आवश्यक आहे. पॅप स्मिअर ही अतिशय साधी आणि स्वस्त चाचणी आहे. यामध्ये गर्भाशयाच्या मुखातील पेशी नमुने घेऊन सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तपासण्यासाठी वापरतात. सर्व्हायकल कॅन्सरसाठी अजून एक टेस्ट केली जाते ती म्हणजे HPV DNA Test. ह्यूमन पॅपिलोमा हा विषाणू या टेस्टमध्ये दिसला की सर्व्हायकल कॅन्सरची शक्यता असते.

तोंडाचा कॅन्सर आहे का ते तपासण्यासाठी तोंडाच्या आतील पांढरे डाग किंवा न भरणाऱ्या जखमांची तपासणी करतात. तंबाखू खाणाऱ्यांसाठी ही चाचणी अनिवार्य आहे. पुरुषांमध्ये रक्तातील ‘प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन’ची पातळी वाढली असल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता असू शकते. हे PSA Test ने कळू शकतं. कोलोनोस्कोपी मध्ये दुर्बिणीद्वारे आतड्याची तपासणी करून गाठी (Polyps) शोधल्या जातात, ज्याने आतड्यांचा कॅन्सरचे निदान होऊ शकते. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिक्विड बायोप्सी, आता फक्त रक्ताच्या चाचणीतून शरीरात कॅन्सरच्या पेशी आहेत का, हे ओळखण्याचे तंत्रज्ञानही भारतात उपलब्ध होत आहे.

पण इतक्या सगळ्या टेस्ट असूनही भारतात स्क्रीनिंगचे प्रमाण खूप कमी आहे. कारण काय तर “त्रास होत नाही, तर चाचणी कशाला?” हा विचार सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच कॅन्सरचे नाव ऐकल्यावर लोक घाबरतात. “जर निदान झाले तर काय होईल? कॅन्सर म्हणजे आता मृत्यूच का?” या भीतीने अनेकजण तपासणी टाळतात. ग्रामीण भागात स्क्रीनिंग सेंटर किंवा तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. तर काही लोकं या टेस्ट महागड्या आहेत म्हणून करत नाहीत. पण जर तुमचे वय ४० च्या वर असेल किंवा तुमच्या कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित स्क्रीनिंग सुरू करा. लक्षात ठेवा, “लवकर निदान, हेच उत्तम संरक्षण.”

Team Jabari Khabari

Share
Published by
Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

14 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

14 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago