Lifestyle

Diwali 2025:ख्रिस्मस मॅगझिन ते दिवाळी अंक: लंडनपासून सुरु झाला मराठी दिवाळी अंकाचा रंजक प्रवास

History of Diwali Ank: दिवाळी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर साहित्य क्षेत्रात आपल्याला मोठ्या हालचाली होताना दिसतात. म्हणजे लेखकांपासून ते पब्लिशिंग हाऊसपर्यंत एकच लगबग दिसून येते ती म्हणजे दिवाळी अंकांची. दिवाळीत दिवाळी अंकांचं महत्वसुद्धा तितकंच आहे जितकं सोनपापड्याचे बॉक्स, फटाके आणि नवीन कपडे सोबतच व्हाट्सअप फॉरवर्ड्स. दिवाळी अंक हा वाचक मित्रांचा साहित्य फराळ मानला जातो. नवनवीन विषय,कथा,कविता यांनी नटलेले हे अंक कधी एकदा प्रकाशित होतात याची वाट लोकं दिवाळीत बघत असतात. पण हे दिवाळी अंक नक्की सुरू कधी पासून झाले आणि कोणी सुरू केले त्याबद्दल आज जरा जाणून घेऊया.

Diwali 2025:इंग्रजांची ‘ती’ चूक आणि आपल्याला मिळू लागला दिवाळी बोनस! वाचा सविस्तर

History of Sunday:महाराष्ट्रातील एक आंदोलन आणि ‘या’ मराठी माणसामुळे मिळू लागली सर्वांना रविवारची सुट्टी!

मराठीत 1909 साली पहिला दिवाळी अंक मासिक मनोरंजनचा प्रकाशित झाला होता आणि तो प्रकाशित करणारे व्यक्ती होते का. र. मित्र अर्थात काशिनाथ रघुनाथ आजगावकर.

2 नोव्हेंबर 1871 रोजी त्यांचा जन्म झाला होता. काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती सोबतचं मराठी इतकीच बंगाली संस्कृतीची देखील त्यांना पुरेपूर माहिती होती. बंगाली साहित्याचे ते अनुवादकसुद्धा होते. बंगाली भाषेच्या प्रेमापोटी त्यांनी मित्र हे आडनाव लावायला सुरवात केली हेच आडनाव पुढे प्रचलित झालं आणि त्यांची मुख्य ओळख बनली.

1895 साली काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांनी मासिक मनोरंजन सुरू केलं. पण मराठीत दिवाळी अंक सुरू कसा झाला याचीसुद्धा एक धमाल गोष्ट आहे. त्यांच्या एका मित्राने लंडनमध्ये ख्रिसमस मध्ये निघणाऱ्या टाइम्स लिटररीसप्लिमेंट त्यांना दाखवली. ख्रिसमसमध्ये इंग्लिश मासिकांचा ख्रिसमस स्पेशल अंक असतोच तसाच मराठीत असावा आणि बंगाली संस्कृतीतही तशी प्रथा होती म्हणून त्यांच्या डोक्यात विचार आला की आपणही मराठीमध्ये दिवाळी अंक काढायला पाहिजे.

1909 साली काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांनी मासिक मनोरंजनाचा पहिला दिवाळी अंक काढला आणि एक नवी मुहूर्तमेढ रोवली. 1909 ते 1935 पर्यंत तो दिवाळी अंक नेटाने चालू ठेवला. आजगावकर यांनी कथा, कविता, कादंबऱ्या, विनोद , अध्यात्म, काव्यचर्चा, साहित्य समालोचन अशा प्रकारचा ठळक मजकूर मासिक मनोरंजनच्या पहिल्या मराठी दिवाळी अंकातून प्रकाशित करायला सुरुवात केली. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,काशीबाई कानिटकर, केशवसुत, वा.व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक त्यांच्याशी जोडले गेलेले होते.

23 जून 1920 रोजी काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचं निधन झालं पण त्यांनी दिवाळी अंकांची रोवलेली मुहूर्तमेढ आजही टिकून आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

54 minutes ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

2 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

20 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

21 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago