हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याण व दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असे म्हणतात की, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी हे व्रत साजरे केले जाईल.
विवाहेच्छुक मुलींनी का करावे हरतालिकेचे व्रत?
विवाहेच्छुक मुलींनी हरतालिकेचे व्रत करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. खरंतर, हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. त्याशिवाय विवाहेच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीही हे व्रत करतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही करू शकतात.
वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत पूर्वी निर्जल ठेवले जायचे. परंतु, अलीकडच्या काळात हे व्रत फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार हरतालिकेचे व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते, अशीही मान्यता आहे.
व्रतासह केली जाते हरतालिकेची पूजा
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाचीदेखील पूजा केली जाते. तसेच हरितालिकेच्या कथेचे पठण केले जाते. त्यासह जर तुम्ही विवाहयोग्य असाल आणि अनेक कारणांमुळे तुमचा विवाह होण्यास अडथळे येत असतील, तर देवी पार्वतीचे आणखी एक स्तोत्र खूप प्रभावी मानले जाते, असं म्हणतात. या स्तोत्राच्या नियमित पठणाने अविवाहितांना सुयोग्य जोडीदार प्राप्त होतो, तसेच विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखमय राहते.
देवी पार्वतीचे प्रभावी स्तोत्र
उत्तम जोडीदार मिळावा, यासाठी नियमित देवी पार्वतीच्या ‘पार्वती पंचक’ स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून, त्यामुळे मनातील इच्छा लवकर पूर्ण होते. या स्तोत्राच्या नियमित पठणाने केवळ विवाहच नाही, तर आयुष्यात सुख, शांतीदेखील प्राप्त होते.
पार्वती पंचक स्तोत्राचे पठण कसे करावे?
धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी पार्वती पचंक स्तोत्र पठण करणे उत्तम मानले जाते. सकाळी लवकर उठून अंघोळ करून, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दीप लावून या स्तोत्राचे पठण करावे. ते पठण करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये. यावेळी मन एकाग्र करावे. पठण झाल्यानंतर देवी पार्वतीला नैवेद्य अर्पण करावा
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…