News

नुतनीकृत राम गणेश गडकरी रंगायतनचे भव्य लोकार्पण स्वातंत्र्यदिनी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे, नव्या रुपात रंगणार कला!

ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच यावेळी लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ‘फोकलोक’ हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.

31 कोटी रुपयांचा नुतनीकरण प्रकल्प
रंगायतनची स्थापना 1978 मध्ये झाली होती, तर 1998 मध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. आता 26 वर्षांनी त्याचे सर्वंकष नुतनीकरण झाले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झालेल्या या कामादरम्यान रंगभूमीवरील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी रंगायतनच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाकडून 31 कोटी रुपये निधी मंजूर केला होता. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीतून नाट्यगृहाची स्ट्रक्चरल दुरुस्ती, नवीन खुर्च्या, रंगमंचाचे नुतनीकरण, अत्याधुनिक ध्वनी-प्रकाश व्यवस्था, वातानुकूलन, अग्निशमन यंत्रणा, उद्वाहक (लिफ्ट), विद्युत यंत्रणा, दर्शनी भागाचे सुशोभीकरण, नवीन ट्रान्सफॉर्मर व जनरेटर आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
लोकार्पण सोहळ्यासाठी रंगायतन व परिसर सजवण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ गायक मुकुंद मराठे, संपदा माने, तन्वी गोरे, शरण्या शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी आणि प्रतीक फणसे यांची नांदी सादर केली जाणार आहे. त्यांना केदार भागवत (ऑर्गन) व आदित्य पानवलकर (तबला) साथ देतील. यानंतर ‘फ्लूजन’ हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर कलाकारांचा कलाविष्कार सादर होईल. यात पं. विवेक सोनार (बासरी), पं. मुकुंदराज देव (तबला), मोहन पेंडसे (व्हायोलीन), किरण वेहेले (कीबोर्ड), अभिषेक प्रभू (बेस गिटार) आणि सचिन नाखवा (ड्रम्स) सहभागी होतील. लोकार्पणानंतर ‘फोकलोक’ हा लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा कार्यक्रम विनामूल्य पाहता येईल. प्रवेशिका गुरुवार, 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रंगायतनच्या तिकिट खिडकीवर वाटप केल्या जातील. प्रत्येक व्यक्तीस दोन प्रवेशिका मिळतील आणि वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर होईल.

या सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे आणि आमदार अॅड. निरंजन डावखरे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Team Jabari Khabari

Recent Posts

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

2 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

3 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

21 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

22 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago